संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात तथाकथित ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी शरद पवारांच्या उपस्थित प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकप्रकारे याला मूकसंमती दिली. त्यामुळे भाजपाने शरद पवार यांच्या विरोधात रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे यासह अनेक भजन म्हणत आंदोलन केले.
यावेळी हिंदूच्या अपमनाला तुमची मुक संमती आहे का, शरद पवार (Sharad Pawar) हाय हाय, उद्धव ठाकरेंचे करायचे काय खाली मुडंके वर पाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. ज्ञानेश महाराव तोंडी हिंदू देवदेवतांची स्क्रिप्ट तुमचीच आहे का?, असा सवाल यावेळी शिरीष बोराळकर यांनी केला आहे. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजपाच्या वतीने करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधाचे वेगवेगळे बॅनर देखील या आंदोलनात लावण्यात आले होते. शरद पवार हाय हाय खाली मुंडके वर पाय, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
(हेही वाचा आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे त्याला सरन्यायाधीश जायचे; Devendra Fadanvis यांचा टोला)
शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरुवातीला भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिंदे सेनेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. हिंदू देवतांचे अपमान केले जात असतानाही शरद पवार (Sharad Pawar) शांत होते. त्यामुळे केवळ एका समाजाची मते मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे टीका शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. यावेळी पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Join Our WhatsApp Community