Road Cavity : प्रभादेवीतील पी बाळू जंक्शनवरील रस्त्याचा भाग खचला

258
Road Cavity : प्रभादेवीतील पी बाळू जंक्शनवरील रस्त्याचा भाग खचला
Road Cavity : प्रभादेवीतील पी बाळू जंक्शनवरील रस्त्याचा भाग खचला
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

प्रभादेवीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गा जोडणाऱ्या पी बाळू मार्ग आणि न्यू प्रभादेवी रोड जंक्शनला गुरुवारी सकाळी रस्त्याचा काही भाग खचण्याचा प्रकार घडला. या रस्त्याचा मध्यभागी काही भाग खचला जावून मोठा खड्डा निर्माण झाला. मात्र, याचा काही भाग खचला जात असल्याने वाहन चालकांसाठी हा मार्ग बंद केल्याने यत कोणतीही हानी झाली नाही. मात्र, या खचलेल्या भागाची महापालिकेच्या रस्ते विभागाच्या वतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे असून या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. (Road Cavity)

प्रभादेवी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर गुरुवारी सकाळी काही भाग खचला जात असल्याचा प्रकार घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तातडीने येथील वाहतूक दुसऱ्या बाजुला वळती केली आणि त्यानंतर महापालिकेच्या रस्ते विभागा अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. येथील खचलेला रस्ता जेसीबीने अधिक खोदून पोकळी निर्माण झालेला भाग तोडण्यात आला आणि त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आला. (Road Cavity)

(हेही वाचा – Dnyanesh Maharao यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पनवेलमध्ये हिंदू उतरले रस्त्यावर)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याखालून शंभर वर्षे जुन्या जलवाहिनी जात असून असून त्यामध्ये ५६ इंच व त्यापेक्षा अधिक इंच व्यासाच्या अशाप्रकारे दोन जलवाहिनी आहेत. या जलवाहिनी तसेच मलवाहिनीला कुठे तरी गळती लागल्याने यामुळे माती तथा वाळू या पाण्यासोबत वाहून गेल्याने तिथे पोकळी निर्माण झाली असावी तसेच यामध्ये येथील बांधकाम कमकुवत बनून हा रस्ता खचला गेला असावा असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्याचा भाग अधिक खोदून यातील पोकळीचा शोध घेऊन त्यानुसार दुरुस्ती करण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Road Cavity)

रस्त्याचा काही भाग खचल्यानंतर स्थानिक आमदार आणि श्री सिध्दीविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी घटनास्थळी धाव घेवून रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून भविष्यात अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊन नये याकरता या रस्त्याखालील भागाची पाहणी करावी तसेच समुद्र किनारा जवळ असल्याने या रस्त्याखाली वाळूचे प्रमाण असल्याने जलवाहिनी अथवा मलवाहिनीला गळती लागल्याने हा प्रकार घडू शकतो. ही बाब लक्षात घेता या भागातील जलवाहिनी तसेच मलवाहिनीला कुठे गळती लागली नाही ना याची तपासणी केली जावी अशाही सूचना सरवणकर यांनी केली. (Road Cavity)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.