Street lights : मुंबईच्या लखलखाटातील पिवळी किनार कायम, रस्त्यावर आजही सोडियम व्हेपरचे सुमारे ४८०० पथदिवे

611
Street lights : मुंबईच्या लखलखाटातील पिवळी किनार कायम, रस्त्यावर आजही सोडियम व्हेपरचे सुमारे ४८०० पथदिवे
Street lights : मुंबईच्या लखलखाटातील पिवळी किनार कायम, रस्त्यावर आजही सोडियम व्हेपरचे सुमारे ४८०० पथदिवे
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईच्या रस्त्यावरील सोडियम व्हेपरचे पथदिवे बदलून एलईडीचे (LED) दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अद्यापही मुंबईतील ४७६६ पथदिवे हे सोडियम व्हेपरचे आहे. सन २०१५ -१६मध्ये रस्त्यावरील पथदिवे (Street lights) एलईडीचे बसवण्याचा निर्णय घेतला, परंतु आतापर्यंत १ लाख ३६ हजार दिवे एलईडीचे (LED) करण्यात यश आले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानंतर मुंबईतील सोडियम व्हेपरच्या (Sodium Vapor) सर्व पथदिव्यांच्या जागी एलईडी (LED) दिवे बसवले जात आहेत. केंद्राच्या धोरणानुसार विद्युत बचतीसाठीची योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेतल. यासाठी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड यांना मुंबईतील दिवाबत्तीच्या खांबावर एलईडी दिवे बसवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील पथदिवे हे सोडियम व्हेपर ऐवजी एलईडीमध्ये रुपांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार मरिन ड्राईव्ह येथील सोडियम व्हेपरचे दिवे काढून एलईडी (LED) दिवे बसवण्याचे काम हाती घेतल्यानंतर याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता, त्यानंतर पुन्हा एलईडी (LED) दिवे काढून तिथे सोडियम व्हेपरचे दिवे लावण्यात आले होते. परंतु हळूहळू हा विरोध मावळला आणि सोडियम व्हेपरचे दिवे काढून पुन्हा एलईडी दिवे लावण्याच्या कामाला गती देण्यात आली. सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा प्रकाश हा पिवळसर असतो आणि एलईडी दिव्यांचा प्रकाश हा शुभ्र पांढरा प्रकाश पडतो.

(हेही वाचा – MIM चे इम्तियाज जलील Shiv Sena UBT च्या वाटेवर?)

त्यानुसार सन एप्रिल २०२२ पर्यंत सव्वा लाख पथदिवे (Street lights) हे एलईडी (LED) दिव्यांमध्ये रुपांतर केले होते, परंतु आतापर्यंत ही संख्या केवळ १ लाख ३६ हजार एवढीच आहे. मुंबईत सुमारे १ लाख ४१ हजार १४५ सोडियम व्हेपरचे (Sodium Vapor) दिवे असून अद्यापही ४७५६ दिव्यांचे रुपांतर एलईडी दिव्यांमध्ये झालेले नाही.

दिवाबत्तीची देखभाल वेगवेगळ्या वीज वितरण कंपन्यांच्या माध्यमातून होत असून भाडेतत्वावरील देखभालीच्या व्यवस्थेचा खर्च महापालिकेच्या वतीने संबंधित बेस्ट, अदानी आणि महावितरण संस्थांना दिला जातो. या एलईडी दिव्यांचा वापर अधिक केल्याने विजेच्या बिलांमध्ये मोठ्याप्रमाणात बचत झाली आहे. एलईडी दिव्यांमध्ये रुपांतर केल्याने मोठया प्रमाणात ऊर्जेच्या बचतीत अधिक वाढ होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.