Veer Savarkar यांचा सल्ला पाळला असता, तर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला नसता; रणजित सावरकर यांचे मत

दिल्लीच्या लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दोन दिवसीय आयसीएचआर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रणजित सावरकर बोलत होते.

122

भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवात 1947 साला झालेली नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास महाभारत आणि रामायणात आढळतो. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी परराष्ट्र धोरणाविषयी बोलले आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण जितके ऐतिहासिक आहे तितकेच ते जगाच्या बदलत्या स्वरूपानुसार नवीन आहे, असे मत वीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Veer Savarkar) यांनी व्यक्त केले.

दिल्लीच्या लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दोन दिवसीय आयसीएचआर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रणजित सावरकर बोलत होते.

वीर सावरकरांनी नौदल बळकट करण्याचा दिलेला सल्ला

रणजित सावरकर (Veer Savarkar) यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची रूपरेषा सांगताना सांगितले की, परराष्ट्र संबंधांमध्ये सागरी शक्ती वाढवणे हा प्राधान्यक्रम मानला जातो.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यादरम्यान अंदमान तुरुंगात असताना त्यांनी भारताचे नौदल अधिक शक्तिशाली असावे, असा विचार मांडला होता. वीर सावरकर यांच्या विचारावर जर गांभीर्याने विचार केला असता तर भारताला मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले नसते, असेही रणजित सावरकर म्हणाले.

इतर देशांशी संबंध निर्माण करण्याबाबत होते आग्रही

रणजित सावरकर (Veer Savarkar) म्हणाले की, वीर सावरकर हे इंग्रजांविरुद्ध १८५७ चे बंड हा स्वातंत्र्याचा पहिला लढा मानत होते. भारताचे परराष्ट्र धोरण महत्त्वाचे मानून वीर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीतच इतर देशांशी संबंध निर्माण करण्यावर भर दिला होता. भारताचे परराष्ट्र धोरण स्वातंत्र्यानंतर 1947 पासून सुरू झाले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आपल्या धार्मिक ग्रंथ रामायण आणि महाभारतात परराष्ट्र धोरणाचा उल्लेख दिसतो.

(हेही वाचा आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे त्याला सरन्यायाधीश जायचे; Devendra Fadanvis यांचा टोला)

सावरकरांच्या परराष्ट्र धोरणाची माहिती नव्या पिढीला होणे आवश्यक

दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजचे प्राचार्य प्रत्युष वत्सला यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात भारतीय मूल्यांच्या महत्त्वावर भर दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar)परराष्ट्र धोरण, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरच्या अलिप्ततेविरुद्धचा लढा आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अखंड मानवतावाद याविषयी नव्या पिढीला माहिती देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मित्राचा शत्रू हा शत्रू हे धोरण पाळा

संयोजक भारती छिब्बर म्हणाल्या की, भारताच्या परराष्ट्र धोरणावर आपली संस्कृती आणि मूल्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. श्रीरामांच्या परराष्ट्र धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लहान राज्यांनी त्यांच्याकडे कधीच संशयाने पाहिले नाही. रामाने स्वतः आर्यवर्तासारख्या महान साम्राज्याच्या संरक्षणाखाली असूनही सर्वांना समान वागणूक दिली. मित्राचा शत्रू हा शत्रू असतो या धोरणाला अनुसरून श्रीरामाने किष्किंधाचा राजा बालीचा वध केला आणि सुग्रीवाला पुन्हा एकदा तेथील अधिपती बनण्यास मदत केली.पूर्वी सुग्रीव हा किष्किंधाचा राजा होता, त्याला बालीने जबरदस्तीने काढून टाकले होते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचाही अग्नी पुराणात उल्लेख आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.