भारतात Green Hydrogen निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी

134
भारतात Green Hydrogen निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी
भारतात Green Hydrogen निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी

सप्टेंबर १२, २०२४ थरमॅक्स या ऊर्जा व पर्यावरणविषयक उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या तसेच ऊर्जा स्थित्यंतरातील विश्वासू सहयोगी समजल्या जाणाऱ्या कंपनीने सेरेस पॉवर होल्डिंग्ज पीएलसी (सीडब्ल्यूआर.एल) ची उपकंपनी सेरेस पॉवर लिमिटेड या पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या आघाडीच्या कंपनीशी धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. सेरेसच्या प्रगत सॉलिड ऑक्साइड इलेक्ट्रोलिसिस (एसओईसी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थरमॅक्ससाठी स्टॅक अरे मॉडेल्स (एसएएम) उत्पादित करण्याचा नॉन-एक्सक्लुजिव, जागतिक परवाना करार या दोन कंपन्यांमध्ये झाला आहे. थरमॅक्स एसएएम बॅलन्स ऑफ मोड्युल (एसबीएम) आणि मल्टि-मेगावॉट एसओईसी इलेक्ट्रोलिजर मोड्युलही विकसित करणार आहे तसेच त्याचे व्यावसायिकीकरण करून विक्रीही करणार आहे. या भागीदारीमुळे भारतात व जगभरात एसओईसी तंत्रज्ञानाच्या उपयोगास वेग देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक हायड्रोजनची किफायतशीर निर्मिती शक्य होणार आहे. (Green Hydrogen)

(हेही वाचा- Shivaji Park : शिवाजी पार्कच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळाचा होणार कमी वापर, ई स्वीपिंग मशीन्सची घेणार मदत)

या भागीदारीअंतर्गत थरमॅक्स आपल्या उष्णता एकात्मीकरण आणि वेस्ट हीट रिकव्हरीतील विस्तृत अनुभवाचा लाभ घेऊन अशा प्रकारचे पहिलेच दाबनियंत्रित (प्रेशराइझ्ड) एसएएम उत्पादित करणार आहे. तसेच एसएएम बॅलन्स ऑफ मोड्युल (एसबीएम) डिझाइन, इंजिनीअर व विकसित करणार आहे. त्यामुळे मल्टि-एमडब्ल्यू एसओईसी इलेक्ट्रोलिजर मोड्युलच्या विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले जाणार आहे. (Green Hydrogen)

सध्याच्या निम्न-तापमान इलेक्ट्रोलिसिस तंत्रज्ञानाच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत अधिक कार्यक्षम प्रणाली निर्माण करून तसेच औद्योगिक प्रक्रियांमधील उष्णता/कचरा रिकव्हरीतून तयार होणाऱ्या वाफेचे प्रभावीरित्या उपयोजन करून हायड्रोजन निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट या सहयोगापुढे आहे. अमोनिया/खते, स्टील, शुद्धीकरण प्रकल्प व रसायन निर्मिती अशा ‘हार्ड-टू-अबेट (कार्बन उत्सर्जन कमी करणे कठीण)’ उद्योगक्षेत्रांना कार्बनमुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी हे एक उपयुक्त उत्पादन ठरणार आहे. (Green Hydrogen)

(हेही वाचा- Civil Aviation : भारत होणार नागरी हवाई वाहतुकीची सर्वात मोठी बाजारपेठ; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा)

व्यापारीकरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणून इलेक्ट्रोलिजर्सच्या उत्पादनासाठी, पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी आणि महत्त्वाच्या भागांच्या स्थानिकीकरणासाठी एक उत्पादन कारखाना स्थापन करण्याची थरमॅक्सची योजना आहे.
या सहयोगामुळे थरमॅक्सला, व्यावसायिक उपयोजनासाठी मोठ्या प्रमाणावरील एसओईसी प्रणाली जागतिक स्तरावर पुरवणाऱ्या मोजक्या कंपन्यांमध्ये स्थान मिळाले आहे. (Green Hydrogen)

थरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष भंडारी या भागीदारीबद्दल म्हणाले: “ऊर्जेच्या नूतनीकरणीय स्रोतांचे, विशेषत्वाने ग्रीन हायड्रोजनचे, उत्पादन करण्यासाठी भारतात लक्षणीय भराऱ्या घेतल्या जात आहेत. २०३० सालापर्यंत ५० लाख (५ दशलक्ष) मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे लक्ष्य देशापुढे आहे. भारतात प्रगत सॉलिड ऑक्साइड इलेक्ट्रोलिसिस (एसओईसी) तंत्रज्ञान आणण्यासाठी सेरेससोबत भागीदारी करताना आम्हाला उत्साह वाटत आहे. थर्मल (उष्णताविषयक) व्यवस्थापनातील आमच्या कौशल्याचा उपयोग करून घेत, अत्यंत कार्यक्षम व किफायतशीर हायड्रोजन निर्मिती देऊ करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. त्यामुळे भारतात व जगभरात ऊर्जा स्थित्यंतराला वेग मिळू शकेल. कार्बन उत्सर्जन कमी करणे कठीण असलेल्या उद्योगक्षेत्रांमधील कार्बनमुक्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी शाश्वत उत्पादनांना चालना देण्याच्या आमच्या बांधिलकीशी हा सहयोग सुसंगत आहे.” (Green Hydrogen)

(हेही वाचा- Veer Savarkar यांचा सल्ला पाळला असता, तर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला नसता; रणजित सावरकर यांचे मत)

सेरेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिल कॉल्डवेल म्हणाले: “थरमॅक्ससोबत एसओईसी प्रणाली भागीदारीची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. थरमॅक्स ही हीट इंटिग्रेशन आणि वेस्ट हीट रिकव्हरी प्रक्रिया आणि सखोल औद्योगिक ग्राहक संबंधांमध्ये कौशल्य असलेला एक अभियांत्रिकी नेता. या नवीन प्रणाली परवाना करारामुळे सेरेस भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन स्टील व ग्रीन अमोनिया यांच्यासाठी सर्वांत गतीशील व महत्त्वपूर्ण बाजारपेठांपैकी एक होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल वेगाने सुरू आहे. (Green Hydrogen)

हा सेरेससाठी एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा करार आहे. कारण आम्ही जागतिक दर्जाच्या भागीदारांसोबत जागतिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. आमच्या तंत्रज्ञानामुळे थरमॅक्सला ‘हार्ड-टू-अबेट’ उद्योगक्षेत्रांतील ग्राहकांसाठी अत्याधुनिक हायड्रोजन उत्पादने निर्माण करण्याची क्षमता मिळणार आहे आणि आमच्या उत्पादन परवान्यांच्या बाजारपेठांतील मागणीला उत्तेजन मिळणार आहे. नवीन प्रदेशातील प्रवेशामुळे सेरेसला एक महत्त्‍वपूर्ण संधी मिळाली आहे. कारण या वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठेत औद्योगिक कार्बनमुक्तीच्या दिशेने जाण्यासाठी उद्योगक्षेत्रांना मदत करण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.” (Green Hydrogen)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.