Chemical Gas Leakage : अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

186
Chemical Gas Leakage : अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
Chemical Gas Leakage : अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपनीतून गॅस गळती; प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीतून १२ सप्टेंबरच्या रात्री गॅस गळती झाली. त्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर पसरला आहे. या वायूगळतीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Chemical Gas Leakage)

(हेही वाचा – भारतात Green Hydrogen निर्माण करण्यासाठी थरमॅक्सची सेरेसशी भागीदारी)

गुरुवार, १२ सप्टेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीच्या परिसरात उग्र वास येऊ लागला. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास जाणवू लागला. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोडवर वायू मोठ्या प्रमाणावर पसरला होता. त्यामुळे नागरिकांनी अग्निशामन दलाला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि चौकशी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असे सांगण्यात आले.

संबंधित कंपनीने जाणीवपूर्वक वायू सोडला की चुकून वायूगळती झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात (Ambernath) धुराचे साम्राज्य पसरले होते. हा धूर मध्य रेल्वेच्या रुळांपर्यंत येऊन पसरला होता, तसेच दृश्यमानताही कमी झाली होती. हा धूर किंवा वायू कसा पसरला, याबाबत अद्याप स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

‘रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात हा धूर पसरला होता. वायू प्रदूषण मंडळाच्या मोबाईल व्हॅनकडून सध्या हवेची तपासणी सुरु आहे. नेमका वायू कोणता आहे, याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस,लएमआयडीसी अग्निशमन दल आणि वायू प्रदूषण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. परिस्थिती आटोक्यात आली असून घाबरून जाण्याची गरज नाही’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Chemical Gas Leakage)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.