राहुल गांधी (Rahul Gandhi) सत्तेत आले, तर आरक्षण जाणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व समाजामध्ये जाऊन समाजप्रबोधन करणार आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाच्या विरोधातील वक्तव्यावर भाजपच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्यासाठी काहीही ! …म्हणून मिळाले शिवसेनेला संसदेत कार्यालय)
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही चुकलो, हे आम्हाला मान्य आहे. मात्र त्यात आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या, त्या विधानसभेला दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही दावा करत नाही मात्र प्रयत्न नक्कीच करणार आहोत. सरकार कोणतेही असो, काही ना काही कमतरता राहतेच, मात्र त्या दूर करण्याचा आमचा आहे.
अजित पवार अनेक वर्षे सोबत राहतील
अजित पवार आताच नाही, तर पुढील अनेक वर्षे आमच्या सोबत राहतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये चांगला समन्वय आहे. राहुल गांधी यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे, असेही बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community