ICC Test Championship : अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित १० पैकी ‘इतक्या’ कसोटी जिंकाव्याच लागतील

ICC Test Championship : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी भारताला १० कसोटी खेळायच्या आहेत. 

188
ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी मुख्य स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच
  • ऋजुता लुकतुके

सप्टेंबर महिन्यापासून भारतीय संघ आपल्या कसोटी मोहिमेला सुरुवात करेल. सुरुवातीला मायदेशात बांगलादेशविरुद्ध २ तर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने भारतीय संघ खेळणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाला ५ कसोटी खेळायच्या आहेत. कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना ११ जुलैला लॉर्ड्सवर रंगणार आहे. भारताला सलग तिसऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरायचं असेल तर आगामी कसोटींमध्ये संघाची कामगिरी कशी असली पाहिजे याचा आढावा आता घेऊया. (ICC Test Championship)

टेस्ट क्रमवारीत पहिले दोन संघ दर दोन वर्षांनी येणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत आमने सामने येतात. आताच्या घडीला या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची यशाची टक्केवारी ही ६८.१२ टक्के आहे तर ऑस्ट्रेलियाची ६२.५ टक्के इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला न्यूझीलंडचा संघाची यशाची टक्केवारी ५० टक्के इतकी आहे. (ICC Test Championship)

(हेही वाचा – राहुल गांधी सत्तेत आले, तर आरक्षण जाणार; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार)

त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड दरम्यानची कसोटी मालिका ही महत्त्वाची असणार आहे. ही मालिका जिंकून भारत निर्विवादपणे न्यूझीलंडच्या पुढे जाऊ शकतो. भारताला सध्याची यशाची टक्केवारी कायम ठेवायची असेल तर उरलेल्या १० कसोटींपैकी ७ कसोटी भारताला जिंकाव्या लागतील. यातील ५ बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात असल्यामुळे भारतासाठी हे शक्यही आहे. मागच्या सलग चारवेळा भारताने बोर्डर-गावसकर करंडक आपल्याकडे राखला आहे. त्यामुळे यंदाही २ कसोटी जिंकणं भारतासाठी अशक्य नाही. भारताने आणखी एक कसोटी जिंकली तर टक्केवारी ६४ टक्क्यांच्याही वर जाईल. (ICC Test Championship)

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणखी ७ कसोटी खेळणार आहे. यातील ४ जिंकल्या आणि १ अनिर्णित राखल्या तरी ऑस्ट्रेलिया आहे त्या स्थानावर राहू शकेल. तर न्यूझीलंडला उर्वरित कालावधीत ८ कसोटी खेळायच्या आहेत. यातील ६ त्यांना जिंकाव्या लागतील. पण, त्यांच्या ५ कसोटी या आशियाई देशांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान खढतर आहे. (ICC Test Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.