government medical colleges in mumbai : मुंबईत कोणकोणते सरकारी वैद्यकीय महाविद्यालये प्रसिद्ध आहेत?

183
government medical colleges in mumbai : मुंबईत कोणकोणते सरकारी वैद्यकीय महाविद्यालये प्रसिद्ध आहेत?

मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट मेडिकल कॉलेजेसमधून एकाची निवड करणे म्हणजे गवताच्या ढिगाऱ्यातून टाचणी शोधण्यासारखं आहे. एक चांगलं मेडिकल कॉलेज हे तुमच्या क्लिनिकल एक्सपोजर, संधी आणि व्यावसायिक नेटवर्कवर प्रभाव टाकतं. एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण, अत्याधुनिक सुविधा आणि को-ऑपरेटिव्ह टीम प्राप्त होते. या सर्व गोष्टी तुम्हाला भविष्यातले एक चांगले डॉक्टर होण्यासाठी तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. (government medical colleges in mumbai)

मुंबई शहरात एकूण ६२ मेडिकल कॉलेज आहेत. त्यांपैकी ३९ खाजगी संस्थांचे कॉलेज आहेत. तर २३ कॉलेज हे सरकारी आहेत. मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट १० मेडिकल कॉलेजेसमध्ये पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, एम.जी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस आणि तेरणा मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम असे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजेच MBBS प्रोग्राम्स, डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच MD आणि मास्टर ऑफ सर्जरी म्हणजेच MS प्रोग्राम आहेत. (government medical colleges in mumbai)

(हेही वाचा – Paris Paralympics 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरालिम्पिक विजेत्यांशी भेट

त्यांपैकी एम.बी.बी.एस. प्रोग्राममध्ये साडेपाच वर्षांचा अतिशय कठोर असा अभ्यासक्रम आणि एका वर्षाची इंटर्नशिप यांचा समावेश आहे. भारतात एम.बी.बी.एस. च्या प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणं अनिवार्य आहे. काही कॉलेजांमध्ये महाराष्ट्र NEET स्कोअर देखील स्वीकारला जातो. (government medical colleges in mumbai)

तुमच्या एम.बी.बी.एस. डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मुंबईतले काही प्रमुख मेडिकल कॉलेजेस पाहूया…

ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स
●पहिल्या वर्षाची फी रु. १.३९ लाख

सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज
●पहिल्या वर्षाची फी रु. १.४४ लाख

लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज
●पहिल्या वर्षाची फी रु. १.४३ लाख

(हेही वाचा – deenanath mangeshkar hospital pune का आहे इतकं प्रसिद्ध आणि कोणकोणत्या सुविधा मिळतात?)

टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज
● पहिल्या वर्षाची फी रु. १.४२ लाख

एच.बी.टी. मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर.एन. कूपर म्यूनिसिपल जनरल हॉस्पिटल
●M.B.B.S. प्रोग्रामची एकूण फी रु. ६.२२ लाख

एम.बी.बी.एस. प्रोग्रामसाठी मुंबईतल्या सरकारी मेडिकल कॉलेजची निवड केली तर वाजवी किंमतीत उच्च दर्जाचं शिक्षण मिळण्याची हमी मिळते. या ठिकाणी प्रशिक्षण आणि संशोधनासाठी भरपूर संधी उपलब्ध होतात. मग त्वरा करा! (government medical colleges in mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.