Gutkha बंदी तरीही अवैध गुटखा विक्री सुरुच

75
Gutkha बंदी तरीही अवैध गुटखा विक्री सुरुच

राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटख्याची (Gutkha) मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी मोठी खेप धारणी पोलिसांनी पकडली. ट्रकमधून सुमारे २५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. एकूण ३५ लाखांचा हा मुद्देमाल आहे. अमरावती-बडनेरा येथील गुटखा तस्करांसाठी हा माल आणला जात असल्याचे ताब्यात घेतलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. पोलिस सूत्रांनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरहून अमरावती येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटख्याची मोठी खेप येत असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती.

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

त्यानुसार ढाकणा फाट्यावर सापळा रचून एमपी ०९ जीएफ ९४८३ क्रमांकाचा ट्रक थांबवून पोलिसांनी तपासणी केली. वायरच्या गुंडाळ्यांमागे पोत्यांमध्ये दडविलेला २५ लाखांचा माल आढळून आला. पोलिसांनी मुद्देमालसह ट्रक जप्त केला. चालक जयश मिश्रा आणि वाहक रामलाल मेहरा यांना देखील अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली धारणीचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक सतीश झाल्टे, ईश्वर सोळंके, पोलिस अंमलदार शेख गणी, राम सोळंके, कृष्णा जामूनकर, संजय मिश्रासह इतर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. (Gutkha)

(हेही वाचा – हिमाचलमधील Mosques चे अवैध बांधकाम हटवा; महापालिका आयुक्त न्यायालयाचा आदेश)

पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे. या प्रकरणाचे तार अमरावती शहरातील गुटखा (Gutkha) तस्करांशी जुळून आले आहेत. यासंदर्भात धारणीचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव म्हणाले की गोपनीय माहितीवरून नाकाबंदी करून ट्रकची झडती घेतली. त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळला. ट्रकसह ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.