Shiv Sena UBT चा सुद्धा आरक्षण रद्द करण्याला पाठिंबा

205
Shiv Sena UBT चा सुद्धा आरक्षण रद्द करण्याला पाठिंबा
  • खास प्रतिनिधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षण रद्द करण्याबाबतच्या व्यक्तव्याला शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) उघड समर्थन दिले. त्यामुळे शिवसेना उबाठादेखील देशातील आरक्षण रद्द करण्याच्या मताचे आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्रातील मराठी माणूस विचारात आहे.

(हेही वाचा – आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा मनसुबा; पनवेलमध्ये BJP ची तीव्र निदर्शने)

..तोपर्यंत आरक्षण राहणार

“राहुल गांधी यांचे वक्तव्य हे नेहमीप्रमाणे भाजपाने मोडून तोडून समोर आणले आहे, आरक्षण रद्द करु अशा प्रकारचे कोणतही वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचे माझ्या ऐकण्यात आणि वाचनात आलेले नाही. मी त्यांची मुलाखत संपूर्ण ऐकली. भाजपा पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवं ते घेतात बाकी मोडून तोडून टाकतात. काँग्रेसची किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाची भूमिका काय हेही मला माहीत आहे. जोपर्यंत समाजात विषमता आहे, समान न्यायचे तत्व लागू होत नाही, दुर्बल समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहणार अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे,” असे संजय राऊत यांनी सांगितले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

भाजपावर टीका, गांधी यांची पाठराखण

राऊत यांनी समान न्यायचे तत्व लागू होत नाही तोपर्यंत आरक्षण राहील, इथपर्यंत बोलून सोयीस्करपणे त्यानंतर आरक्षण रद्द केले जाईल, हे बोलणे टाळले. मात्र राहुल गांधी यांच्या विधानाचा त्यांनी विरोध अजिबात केला नाही. किंबहुना भाजपावर टीका करत गांधी यांची पाठराखण केली. (Shiv Sena UBT)

गांधींचे वक्तव्य

राहुल गांधी यांनी नुकताच तीन दिवसीय अमेरिका दौरा केला. या दौऱ्यावर असताना गांधी यांनी एकावर एक फुल टॉस चेंडू दिले आहेत. गेल्या मंगळवारी १० सप्टेंबर, २०२४ ला वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधत असताना गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले की, “भारत हे समाजिकदृष्ट्या अनुकूल राष्ट्र झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल.” (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.