Cricket Fielding Positions : फलंदाजाला जेव्हा अकरा क्षेत्ररक्षकांनी घेरलं

Cricket Fielding Positions : इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये एका विचित्र घटनेत फलंदाजाभोवती ११ खेळाडूंनी कडं केलं होतं. 

127
Cricket Fielding Positions : फलंदाजाला जेव्हा अकरा क्षेत्ररक्षकांनी घेरलं
  • ऋजुता लुकतुके

इंग्लिश क्रिकेट काऊंटीत सॉमरसेट विरुद्ध सरे हा सामना एका विचित्र गोष्टीमुळे रंगला. सामना सॉमरसेटने जिंकला. यात माजी इंग्लिश कर्णधार मायकेल वॉनचा मुलगा आर्ची वॉनने घेतलेले ११ बळी निर्णायक ठरले. १८ वर्षीय आर्ची आपला फक्त दुसरा काऊंटी सामना खेळत होता. पण, दुसऱ्या डावांत त्याने ३२ षटकांत ३८ धावा देत ५ बळी मिळवले. त्यामुळे २२१ धावांचा पाठलाग करणाऱ्या सरे संघाला फक्त १०९ धावाच करता आल्या. (Cricket Fielding Positions)

सॉमरसेटने १११ धावांनी हा सामना जिंकला. काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत या निकालामुळे रंगत निर्माण झाली आहे. दिसायला हा विजय सहजसोपा दिसत असला तरी शेवटची १० मिनिटं थरारक होती. कारण, शब्दश: शेवटच्या मिनिटांत सॉमरसेटने हा सामना जिंकला. सरेचा संघ ९ बाद १०९ वर खेळत होता. आणि सामन्याची १० मिनिटं शिल्लक होती. तेव्हा सॉमरसेटने गोलंदाज आणि यष्टीरक्षक धरुन उर्वरित नऊच्या नऊ क्षेत्ररक्षक हे फलंदाजाच्या भोवती उभे केले होते. बॅटची हलकी कड घेऊन झेल मिळावा अशी ही व्यूहरचना होती. त्यामुळे मैदानावर लेगसाईडचे पंच फक्त ३० यार्डाच्या वर्तुळावर उभे होते. बाकी सगळे खेळाडू हे घावपट्टी भोवती कोंडाळं करून उभे असतानाचं चित्र दिसत होतं. (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा – आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा मनसुबा; पनवेलमध्ये BJP ची तीव्र निदर्शने)


(हेही वाचा – हिमाचलमधील Mosques चे अवैध बांधकाम हटवा; महापालिका आयुक्त न्यायालयाचा आदेश)

चार्ली वॉन हा अष्टपैलू खेळाडू असून सामन्यांत त्याने १४० धावांमध्ये ११ बळी मिळवले. पहिल्या डावांत त्याने १०२ धावांत ६ बळी टिपले होते. तर अनुभवी इंग्लिश फिरकीपटू जॅक लीचने निर्णायक बळी मिळवला. दुसऱ्या डावांत त्याने ३७ धावांत ५ बळी मिळवले. सरेचा संघ ५ बाद ९३ धावांवर असताना सामना अनिर्णित राखण्याची चांगली संधी त्यांच्याकडे होती. कारण, एक सत्र त्यांना खेळून काढायचं होतं. पण, त्यांनी शेवटचे ७ फलंदाज फक्त १४ धावांत गमावले. बांगलादेशचा स्टार फलंदाज शकिब अल हसन वॉनच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. तिथून सरेची घसरण सुरू झाली. (Cricket Fielding Positions)

काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत आता सरेचा संघ अव्वल स्थानावर आहे. स्पर्धेत अजून दोन सामने बाकी आहेत. सलग तिसरं विजेतेपद सरे संघाला खुणावत आहे. तर सॉमरसेट संघ सरेपेक्षा फक्त ८ गुणांनी मागे आहेत. शेवटच्या टप्प्यात त्यांनी सरेला चांगलंच आव्हान दिलं आहे. (Cricket Fielding Positions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.