Port Blair चे नामांतर केले ‘श्री विजयपुरम’; गुलामगिरीच्या प्रतिकापासून आणखी एक ठिकाण मुक्त

172

केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) सरकारने शुक्रवारी श्री विजयपुरम असे नामकरण केले. गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृहमंत्री शाह म्हणाले.

यापूर्वी, 23 जानेवारी 2023 रोजी नेताजींच्या 126 व्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर नाव देण्याचा निर्णय घेतला होता. 28 डिसेंबर 2018 रोजी अंदमान आणि निकोबारच्या हॅवलॉक बेट, नील बेट आणि रॉस बेटाची नावे बदलण्यात आली. हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप, नील बेटाचे नाव शहीद द्विप आणि रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र द्विप ठेवण्यात आले.

(हेही वाचा Jitendra Awhad यांचे ‘ते’ विधान समाजात तणाव निर्माण करणारेच; उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी घेण्याचे आदेश)

शहा यांनी सोशल मीडियावर लिहिले

“देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृहमंत्रालयाने पोर्ट ब्लेअरला (Port Blair) ‘श्री विजयपुरम’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्य साधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. हे बेट ते ठिकाण आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता आणि वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.

देशात सर्वप्रथम नेताजींनी येथे तिरंगा फडकावला

देशाच्या स्वातंत्र्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला ते हे ठिकाण. वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी शिक्षा म्हणून येथील सेल्युलर जेलमध्ये बरीच वर्षे काढली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढत होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.