Work-Life Balance : जगभरात तरुणांना आता हवी १० ते ४ नोकरी

Work-Life Balance : एका सर्वेक्षणात तरुणांना आता काम आणि घर यांच्यात संतुलन हवं असल्याचं समोर आलं आहे.

189
Work-Life Balance : जगभरात तरुणांना आता हवी १० ते ४ नोकरी
  • ऋजुता लुकतुके

कोव्हिड पूर्वीपर्यंत कामाचे तास म्हणजे ९ ते ५ असं समीकरण पक्कं होतं. पण, कोव्हिड काळात लॉकडाऊन सुरू झालं. आणि लोकांना घरून काम करण्याचा पर्याय मिळाला. अनेकांना हा पर्याय आवडलाही. जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अजूनही घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांनी आता कार्यालयात परतावं यासाठी त्यांची मनधरणी करत आहेत. अशा कंपन्यांना ते कठीणही जात आहे. कारण, कर्मचारी अजूनही कार्यालयात जाऊन काम करण्यासाठी फारसे उत्सुक दिसत नाहीत. (Work-Life Balance)

आणि जे कामावर नाईलाजाने जात आहेत ते कामाचे ९ तास पूर्ण करताना दिसत नाहीत. अनधिकृतपणे, कामाची वेळ १० ते ४ असल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. वाहतूकीच्या वेळांचं निरीक्षण करणाऱ्या इनरिक्स संशोधन संस्थेनं याविषयीचा अहवाल तयार केला आहे. कामाच्या वेळात रस्त्यांवर गर्दी असते. तसंच रेल्वे आणि मेट्रोही भरून वाहतात. त्यावरून इनरिक्सने हे निरीक्षण मांडलं आहे. (Work-Life Balance)

(हेही वाचा – राहुल गांधी विरुद्ध BJP आक्रमक; अमरावतीत पुतळा जाळला)

५८ टक्के लोकांची हायब्रीड मॉडेलला पसंती

‘सकाळी आणि संध्याकाळी नाही तर दुपारच्या वेळात रहदारी वाढलेली दिसून येत आहे,’ असं इनरिक्सचे वाहतूक निरीक्षण अधिकारी बॉब पिश्यु यांनी सीएनबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीशी बोलताना सांगितलं. पिश्यु यांनीच हा अहवाल तयार केला आहे. कामाच्या वेळा कमी करण्यामागे कौटुंबिक स्वास्थ्य आणि काम यातील संतुलन साधण्याचा प्रयत्न हे असल्याचं पिश्यु यांनी म्हटलं आहे. ‘कर्मचारी फक्त महत्त्वाच्या बैठका किंवा इतर कामांसाठी कार्यालयांमध्ये जात आहेत. बाकी बरीचशी कामं ही घरातून होत आहेत. याचं कामाच्या ठिकाणी असलेला ताण सहन होत नसल्यामुळे काहींनी घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक तेव्हा कार्यालय आणि एरवी घरून काम करण्याच्या या प्रकाराला कॉफी बॅजिंग असं नाव देण्यात आला आहे,’ असं पिश्यु म्हणाले. (Work-Life Balance)

आऊल लॅब्ज नावाच्या आणखी एका संशोधन संस्थेनं अलीकडेच कर्मचाऱ्यांची मतं मागवून एक जागतिक सर्वेक्षण केलं होतं. त्यातही ५८ टक्के लोकांनी हायब्रीड मॉडेलला पसंती दिली होती. काम आणि घरातील जबाबदाऱ्या यात संतुलन, कामाचे लवचिक तास आणि मानसिक आरोग्यासाठी कंपनीकडून सहकार्य या गोष्टींना कर्मचारी नोकरी निवडताना पसंती देत आहेत. कामाचे तास लवचिक नसतील तर आपण नोकरी सोडू असं ६६ टक्के कर्मचाऱ्यांनी आऊल कंपनीच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. (Work-Life Balance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.