डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी १२ हजार घरे; Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

185
डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी १२ हजार घरे; Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
  • प्रतिनिधी

मुंबईतील नोकरदार वर्गाला दुपारच्या वेळेत जेवणाचा डबा पुरविणारे मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी ठाणे- भिवंडी मार्गावरील अंजूर गावात १२ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत विकासक आणि राज्य सरकारमार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या तीन वर्षांत साकार होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Assam मध्ये बेकायदा बांधकाम तोडणाऱ्या पथकावर मुसलमानांचा हल्ला; अनेक पोलीस जखमी)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या सभागृहात मुंबईतील डबेवालांच्या घरांबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता यानिमित्ताने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत ही घरे बांधली जाणार असून म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३० एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार असून, नमन बिल्डर ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर हे काम करणार आहेत. यातून १२ हजार घरांची निर्मिती होणार असून ती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रत्येकी ५०० चौरस फूट आकाराचे घर केवळ २५ लाखात यामुळे दिले जाणार आहे. त्यामुळे डबेवाले आणि चर्मकार बंधूंचे मालकी हक्काच्या घराचे स्वप्न येत्या तीन वर्षात साकार होणार आहे.

(हेही वाचा – Port Blair चे नामांतर केले ‘श्री विजयपुरम’; गुलामगिरीच्या प्रतिकापासून आणखी एक ठिकाण मुक्त)

आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही सोडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत आणि म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट मॉडेल आहे. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा संघटनेचे अशोक गायकवाड महाराज आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.