पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 40 वर्षीय आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ठाणे येथील विशेष न्यायालयाचा २९ मार्च २०१४ रोजीचा निकाल कायम ठेवला.
(हेही वाचा Shiv Sena UBT कडून Hindu देवतांचा अपमान करणाऱ्या महाराव यांच्या वक्तव्याचे समर्थन?
रमेश गोपनूर याला पाच अल्पवयीन मुलींवर बलात्कार (Sexual Harassment) केल्याप्रकरणी दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तरतुदीनुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. “पुरावे लक्षात घेता, हे स्पष्ट होते की पाचही पीडितांवर अपीलकर्त्याने लैंगिक अत्याचार केले होते. वैद्यकीय पुरावे आणि घटना पाहता लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होते. फिर्यादीच्या खटल्यानुसार, अपीलकर्त्याला एका पीडितेचे लैंगिक शोषण (Sexual Harassment) करताना शेजाऱ्याने पाहिले होते, ज्याने पीडितेच्या आईला याची माहिती दिली. या घटनेची माहिती इतर शेजाऱ्यांना कळल्यावर, एकामागून एक, उर्वरित चारही पीडितांनी आपल्या आई-वडिलांना गुन्हेगाराने केलेल्या कृत्याची माहिती दिली. ज्याला सर्व पीडित ‘मामा’ म्हणून हाक मारत होते, आरोपीने पीडितांना घरात बोलावून कसे अत्याचार केले हे पीडितांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community