- प्रतिनिधी
दक्षिण मुंबईत अनेक भाषिक जिमखाने (Gymkhana) अस्तित्वात असताना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसासाठी जिमखाना नसल्याची खंत अनेक वर्ष जाणवत असतानाच आता ही उणीवही लवकरच दूर करण्याची ठाम भूमिका राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली. शुक्रवारी त्यांनी मंत्रालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दक्षिण मुंबईतच फक्त मराठी माणसांसाठीच मराठी जिमखाना उभारण्याची जाहीर घोषणाच केली. त्यासाठी चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह सह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्ही.टी.) या परिसरातच जागेचा शोध सुरु असून येथेच मराठी जिमखाना शक्यतो आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच तो उभारण्या संदर्भात प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील चर्नी रोड येथे विविध भाषिकांसाठी जिमखाने (Gymkhana) उभारण्यात आले आहेत. मात्र जो या मुंबईचा मुळ भूमिपुत्र आहे त्या मराठी माणसासाठी एखादा स्वतंत्र जिमखाना नसण्याची उणीव सतत जाणवायची. यासाठीच दक्षिण मुंबईतच मराठी जिमखाना उभारण्यात येणार असल्याची माहिती देतानाच याच भागात मराठी माणूस असावा या प्रामाणिक उद्देशानेच येथेच ती स्वतंत्र वास्तू उभारण्यात येईल, अशीही ग्वाहीही केसरकर यांनी दिली.
(हेही वाचा – आरक्षणविरोधी राहुल गांधी आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड; Ashish Shelar यांचा आरोप)
सध्या चर्नी रोड येथे पारसी जिमखाना (Gymkhana), तर मरीन ड्राईव्ह येथे इस्लाम जिमखाना पोलीस जिमखाना, हिंदू जिमखाना, ख्रिश्चन समाजाचा जिमखाना उभे आहेत. इतकेच काय ज्या समाजाचे अस्तित्वच मूळात नगण्य आहे त्या झोराष्ट्रियन समाजाचाही जिमखाना याच मरीन ड्राईव्ह परिसरात दिमाखात उभा आहे. मात्र ज्या मराठी माणसाने मोठा लढा देवून मुंबई या संयुक्त महाराष्ट्रात राखली त्यांच्यासाठीही याच भागात एखादा जिमखाना असावा असे आपण या मुंबई शहराचे पालकमंत्री झाल्यापासून सतत वाटत होते. अखेर ही बाब आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपल्या कल्पनेला होकार दिल्याने याच परिसरात जागाही शोधण्यास सुरुवात केली व लवकरच दक्षिण मुंबईत मराठी जिमखाना अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आता मराठी जिमखान्यासाठी सरकारकडून लवकरच जागा देण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
(हेही वाचा – Work-Life Balance : जगभरात तरुणांना आता हवी १० ते ४ नोकरी)
लवकरच मराठी भाषा भवन उभे राहणार…
मराठी भाषा भवनासाठी तत्कालीन सरकारने अतिशय कमी जागा मरीन लाईन्स येथे दिली खरी. मात्र ती उभारण्या संदर्भात त्या सरकारने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. गेल्या अडीच वर्षाच्या राजवटीत एक विटही ठेवता आली नाही. मात्र दोन वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत तातडीने पावले उचलली व मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजनही करण्यात येणार असल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community