Uddhav Thackeray यांचा पीए पैसे घेऊन पद विकतो; संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप

197
Uddhav Thackeray यांचा पीए पैसे घेऊन पद विकतो; संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप
Uddhav Thackeray यांचा पीए पैसे घेऊन पद विकतो; संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप

विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. ‘पैसे आणा आणि पदे घ्या’ ही कार्यपद्धती सध्या उबाठा गटात सुरु आहे, असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत, तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय साहाय्यक आहेत.

(हेही वाचा – Mandya (कर्नाटक) येथील गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक; पोलीस निरीक्षक अशोक कुमार निलंबित)

शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिले. ‘पैसे दो पैसे लो’ याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून (कु) प्रसिद्ध असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांचे नाव न घेता आरोप

उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा थेटच आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला, तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. अंधारे या पैसे घेऊन पदे देतात, असा आरोप बीडचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्या वेळीही या आरोपांची चौकशी उबाठा गटाकडून करण्यात आली नाही, याउलट जाधव यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊन अंधारे यांचा बचाव करण्यात आला होता.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने उबाठा गटात खळबळ उडाली आहे.

शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उबाठा गटाने कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ उबाठा गटात सारे काही आलबेल नाही, हे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर देखील उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नाही.

गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या – ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, त्या सर्वांनीच शिवसेनेत विशेष करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून, ते राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.