Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय 

204
Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा 'हिंदुस्थान पोस्ट'चा निर्णय 
Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा 'हिंदुस्थान पोस्ट'चा निर्णय 

भारत आणि बांगलादेश (Bangladesh) दरम्यानची आगामी क्रिकेट मालिका रद्द व्हावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केली होती. बांगलादेशमध्ये पसरलेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान तिथे हिंदूंच्या घरांवर हल्ले होत आहेत. हिंदूंच्या मालमत्तेचे नुकसान केले जात आहे. परिस्थिती अजूनही निवळलेली नाही. अशा वेळी भारताने बांगलादेशविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका सावरकर यांनी मांडली होती. (Ban Ind vs Ban Test Series)

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांचा पीए पैसे घेऊन पद विकतो; संजय शिरसाट यांचे गंभीर आरोप)

त्याला अनुसरून आता ‘हिंदुस्थान पोस्ट’ मीडिया हाऊसने या मालिकेचे वार्ताकन न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील कुठलेही अपडेट आणि माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या व्यासपिठावर दिली जाणार नाही. ‘क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम आणि देशच महत्त्वाचा,’ अशी भूमिका ‘हिंदुस्थान पोस्ट’ जाहीर करत आहे.

गद्दारांशी मैत्री नकोच – रणजित सावरकर

‘१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये एकूण ९ कोटी हिंदूंची कत्तल झाली आहे. इतिहास असे सांगतो की, या देशांच्या इतिहासात हिंदूंच मारले गेले आहेत. बांगलादेशमध्येही देशाची फाळणी झाल्यानंतर नौखाली आणि टिपरा प्रांतांत एकही हिंदू उरला नव्हता. हा इतिहास विसरून चालणार नाही. त्यामुळे भारत – बांगलादेश मालिकेला आमचा विरोध आहे,’ असे रणजित सावरकर म्हणाले आहेत. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच,’ या शब्दांत रणजित सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

‘हिंदुस्थान पोस्ट’नेही गंभीर भूमिका घेतली आहे. १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश दरम्यान कसोटी मालिका रंगणार आहे. सोशल मीडियावर आधीपासूनच या मालिकेला विरोध होत आहे. #BoycottBangladeshCricket असा हॅशटॅगही सोशल मीडियावर सुरू झाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.