2022 ला शिवसेनेत फूट पडली आणि शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा होणार, हा दरवर्षीचा उत्सुकतेचा विषय राहिला आहे. यंदाही शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कुणाचा दसरा मेळावा होणार?, याची राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. उबाठा गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आली. यंदा या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यासाठी उबाठा गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. यंदा या मैदानावर कुणाची सभा होणार, हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे.
(हेही वाचा – Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय )
शिवसेना (Shiv Sena) उबाठा गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेला (BMC) अर्ज करण्यात आला आहे. या अर्जासोबतच मागील आठ महिन्यांत तीन स्मरणपत्र देखील देण्यात आली आहेत. शिवसेना शिंदे गटाने अद्यापपर्यंत अर्ज केला नसल्याची माहिती आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दसरा मेळाव्याच्या सभेसाठी उबाठा आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी मुंबई महापालिकेने उबाठा गटाला सभेसाठी परवानगी दिली होती.
गणेशोत्सवानंतर शिवसेना उबाठा गटाच्या अर्जासंदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. 18 सप्टेंबरनंतर मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला (Dasara Melava) याबाबत कळवणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community