IPL Retention Rule : खेळाडूंना कायम राखण्याविषयीचा नियम बीसीसीआय कधी जाहीर करणार?

IPL Retention Rule : मेगा लिलाव जवळ आला असताना बीसीसीआयने या नियमाविषयी स्पष्टता द्यावी अशी संध मालकांची इच्छा आहे 

77
IPL Retention Rule : खेळाडूंना कायम राखण्याविषयीचा नियम बीसीसीआय कधी जाहीर करणार?
IPL Retention Rule : खेळाडूंना कायम राखण्याविषयीचा नियम बीसीसीआय कधी जाहीर करणार?
  • ऋजुता लुकतुके

नवीन लिलावापूर्वी काही ठरावीक खेळाडूंना सध्याचे संघ मालक कायम ठेवू शकतात. बाकीच्या खेळाडूंचा लिलाव मग पार पडतो. आययपीएल सुरू झाली तेव्हा फ्रँचाईजी आपल्या ताफ्यातले ४ खेळाडू कायम ठेवू शकत होते. हळू हळू या नियमांत थोडाफार बदल होत गेला. दर तीन वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत असतो. यात आणि यंदाचं वर्ष लिलावाचं वर्ष आहे. त्यामुळे यंदा किती आणि कशाप्रकारे खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवायचं या नियमांना अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. (IPL Retention Rule)

(हेही वाचा- Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध)

संधांनी आपली व्यूहरचना आखायलाही सुरुवात केलीय. पण, त्यापूर्वी बीसीसीआयने अजूनही याविषयीचे नियम स्पष्ट केलेले नाहीत. आता बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता पण नाहीए. ही सभा बंगळुरूला २९ सप्टेंबरला होणार आहे. ही सभा संपल्यानंतर काही दिवसांनी खेळाडूंना कायम ठेवण्याचे नियम जाहीर होतील अशी एक शक्यता आहे. क्रिकबझ वेबसाईटने तरी असंच म्हटलं आहे. (IPL Retention Rule)

आधीच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी बीसीसीआयचं धोरण स्पष्ट होणं अपेक्षित होतं. पण, आता त्याला वेळ लागत आहे. बीसीसीआयची तारीख अजून ठरली नसली तरी फ्रँचाईजींना १५ नोव्हेंबरपर्यंत कुठले खेळाडू कायम ठेवायचे हे ठरवता येणार आहे. ती तारीख जवळ जवळ निश्चित आहे. मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. ते पाहता, या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. (IPL Retention Rule)

(हेही वाचा- Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय )

कारण, खेळाडूंना कायम ठेवण्याचे नियम काय ठरतात यावरून फ्रँचाईजींचं धोरण ठरणार आहे. उदा. एक चर्चा अशी आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना ठेवून घ्यायचं असेल तर त्यांना अनकॅप्ड खेळाडू इतकेच पैसे द्यावे लागतील. खासकरून चेन्नई सुपरकिंग्जला नियमातील हा बदल हवा आहे. कारण, त्यांना महेंद्रसिंग धोणीला आतापेक्षा कितीतरी कमी पैसे देऊन कायम ठेवता येणार आहे. आणि त्याचे पैसे ते इतर खेळाडूवर खर्च करू शकतील. (IPL Retention Rule)

थोडक्यात, हा नियम संघांची खेळाडू विकत घेतानाची रणनीती ठरवताना महत्त्वाचा ठरणार आहे. पण, बीसीसीआयने मात्र आतापर्यंत नियम कधी जाहीर करणार यावर मौन बाळगलं आहे. (IPL Retention Rule)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.