-
ऋजुता लुकतुके
फुटबॉलच्या मैदानात विक्रम करणं हे काही ख्रिस्तियानो रोनाल्डोला नवीन नाही. अलीकडेच फुटबॉलमधील ९०० वा गोल त्याने केला आहे. आणि ही कामगिरी करणारा तो फक्त पहिला फुटबॉलपटू आहे. लायनेल मेस्सी त्याच्यापेक्षा ५० गोलनी मागे आहे. आता आणखी एका बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डो मेस्सीच्या पुढे गेला आहे. रोनाल्डोने साधारण महिनाभरापूर्वीच स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. फुटबॉल व्यतिरिक्त तो काय काय करतो, कसा वेळ घालवतो हे या चॅनलच्या माध्यमातून तो दाखवणार आहे. त्यानंतर सोशल मीडियावरील फॉलोइंगच्या बाबतीतही त्याने मेस्सीला मागे टाकलं आहे. (Cristiano Ronaldo)
युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसुबक अशा सर्व समाज माध्यमांवर मिळून रोनाल्डोने तब्बल १ अब्ज फॉलोअर्सना आपल्याकडे आकर्षित केलं आहे. त्या निमित्ताने इन्स्टाग्राम या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या माध्यमावर स्टार खेळाडूंना किती फॉलोअर्स आहेत. आणि या बाबतीत कोण किती पुढे आहे याचा एक आढावा घेऊया. यात कुठला भारतीय खेळाडू पुढे आहे हे ही पाहूया, (Cristiano Ronaldo)
(हेही वाचा- Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू)
१. ख्रिस्तियानो रोनाल्डो (६३० दशलक्ष) – रोनाल्डोचा जन्म पोर्तुगालच्या लहानशा मेदिरा या गावात झाला आहे. तिथून त्याने फुटबॉलमध्ये इथवर मजल मारली आहे. बॅलन दी ओरचे विक्रमी ५ पुरस्कार, पोर्तुगाल, इंग्लंड, स्पेन आणि इटली इथं अनेक लीग विजेतेपदं हे त्याचं संचित आहे. त्याचं इन्स्टाग्राम पेज नियमितपणे अद्ययावत केलं जातं. आपलं खाजगी आयुष्य, तंदुरुस्तीसाठी तो करत असलेले व्यायाम, फावल्या वेळात करत असलेल्या गोष्टी असं सगळं तो इथं दाखवतो. (Cristiano Ronaldo)
२. लायनेल मेस्सी (५४० दशलक्ष) – या अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूने ८ वेळा बॅलन दी ओरवर कब्जा केला आहे. २०२२ मध्ये फिफा विश्वचषक जिंकला आहे. आणि ला लिगाचं विजेतेपद विक्रमी वेळा जिंकलं आहे. इन्स्टाग्राम पेजवर तो कुटुंबीयांबरोबर घालवलेला वेळ आणि तो करत असलेलं समाज कार्य यांची ओळख जगाला करून देत असतो. (Cristiano Ronaldo)
३. विराट कोहली (२७० दशलक्ष) – विराट कोहली हृा यादीतील एकमेव आशियाई खेळाडू आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर तो नियमितपणे आपल्या जाहिराती, पत्नी अनुष्काबरोबरचे फोटो आणि काही मोजके खाजगी क्षण दाखवत असतो. आपलं खाजगीपण पुरेपूर जपण्यासाठी विराट प्रसिद्ध आहे. खासकरून आपल्या मुलांचा चेहरा तो कधीच लोकांसमोर आणत नाही. (Cristiano Ronaldo)
(हेही वाचा- यंदा शिवाजी पार्कवर Dasara Melava कुणाचा ?; कोणी केला सर्वप्रथम दावा…)
४. नेमर ज्युनिअर (२२४ दशलक्ष) – ब्राझीलचा हा फुटबॉलपटू आपल्या मुक्त जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील त्याचा वावरही सगळ्यात आकर्षक असतो. तिच्या जीवनशैलीविषयी तो मोकळेपणाने लोकांना सांगत असतो. मित्र, फॅशन आणि प्रवास यावर तो सगळ्यात जास्त पोस्ट करतो. (Cristiano Ronaldo)
५. लेब्रॉन जेम्स (१५९ दशलक्ष) – लेब्रॉन जेम्स हा एकमेव बास्केटबॉलपटू या यादीत आहे. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील त्याचं आयुष्यही घडामोडींनी भरलेलं आहे. मैदानावर तो एनबीए चषक जिंकतो. त्या बाहेर तो सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात काम करतो. त्याचं समाज कार्य ही त्याची वेगळी ओळख आहे. (Cristiano Ronaldo)
६. कायलन एमबापे (१२२ दशलक्ष) – या यादीतील तो सर्वात तरुण सेलिब्रिटी आहे. १९ व्या वर्षी फिफा विश्वचषक त्याच्या हातात होता. वेगवान खेळ आणि गोल करण्याची हातोटी यामुळे तो लगेचच सगळ्यांच्या नजरेत भरतो. इन्स्टाग्रामवरही तो सक्रिय असतो. आपलं खाजगी आयुष्य आणि कामगिरी यावर तो अनेकदा व्यक्त होतो. (Cristiano Ronaldo)
(हेही वाचा- Maharashtra TET 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला, माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध)
७. डेव्हिड बेकहम (८८.४ दशलक्ष) – निवृत्तीनंतरही पहिल्या दहांत असण्याची किमया डेव्हिड बेकहमने साध्य केली आहे. मँचेस्टर युनायटेड, रियाल माद्रिद आणि एलए गॅलेक्सी या संघांबरोबरची त्याची कारकीर्द विशेष गाजली. फुटबॉलमध्ये बेकहम किक सारखे काही नवीन फटके त्यांनी सुरू केले आणि रुजवले. आताही तो लोकप्रिय आहे. (Cristiano Ronaldo)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community