नव्या राजकीय भूमिकेसाठी सज्ज
माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपानेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा दिल्लीतील पक्षीय कार्यक्रमांमधील वावर वाढला आहे. त्यातून स्मृती नव्या राजकीय भूमिकेसाठी सज्ज होत आहेत. दिल्लीच्या राजकारणात त्या सक्रिय होऊ शकतात, असे संकेत आहेत. भाजपाने २ सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली. त्या मोहिमेशी संबंधित दिल्लीतील महत्त्वाची जबाबदारी स्मृती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपाच्या १४ जिल्हा शाखा आहेत. त्यातील निम्म्या शाखांमधील सदस्य नोंदणी मोहिमेची देखरेख स्मृती करतील. त्यांनी दक्षिण दिल्लीत घरही विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्मृती यांचे पक्षकार्य सदस्य नोंदणी मोहिमेपुरते मर्यादित राहणार नसल्याची कुजबुज सुरू झाली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या घरी आला खास पाहुणा; नामकरण सोहळाही झाला)
आपची सत्ता असणाऱ्या दिल्लीत वेळापत्रकानुसार, पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी केवळ ५ महिने उरले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आपच्या झंझावातापुढे भाजपाचा टिकाव लागला नाही. त्या निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणताही चेहरा दिला नव्हता. मात्र, यावेळी चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी भाजपामध्ये जोर धरू लागली आहे. अशात स्मृती (Smriti Irani) यांचा दिल्लीतील वावर वाढल्याने तर्क-वितकांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून त्याही दावेदार ठरू शकतात, असे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे. स्मृती (Smriti Irani) यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यामुळे दिल्लीत त्यांचे राजकीय लॉन्चिंग सहज शक्य असल्याचे पक्षातील सूत्रांना वाटते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community