-
ऋजुता लुकतुके
गेला आठवडा अमेरिकेत मोठ्या आर्थिक उलाढालींचा होता. सुरुवातीला तर तिथे मंदीची भीती व्यक्त होत होती. त्यानंतर इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचं मूल्य काहीसं घसरलं. या सगळ्याचा परिणाम लोकांचा कल हेजिंग स्वरुपात सोन्याच्या गुंतवणुकीकडे वाढला. आणि जागतिक बाजारात एकाच महिन्यात सोन्या आणि चांदीच्या दरांत २६ टक्क्यांनी वाढ झाली. भारत आपल्या गरजेपैकी ८० टक्के सोनं आयात करत असल्यामुळे भारतातही सोने-चांदीच्या किमतीत (Gold – Silver Price) मोठी वाढ झाली आहे.
सोन्या चांदीच्या दरात शुक्रवारी एका दिवसांत मोठी वाढ बघायला मिळाली. सोनं १,००० रुपये प्रती १० ग्रॅम तर चांदी ४,००० रुपयांनी महाग झाली. एकाच दिवसातातील सगळ्यात मोठी वाढ बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं ४,४०० रुपये इतकी होती. (Gold – Silver Price)
(हेही वाचा – Shreyas Iyer : दुलिप करंडकात जेव्हा श्रेयस अय्यर गॉगल घालून फलंदाजीला आला….)
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात ४,००० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा ८७ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर सोन्याच्या भावातही १ हजार रुपयांची वाढ झाली असून सोने ७३,९०० प्रति १० ग्रॅम इतकी दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याचे संकेतही तज्ञांनी दिले आहेत. त्याचाच हा दृश्य परिणाम दिसून येत आहे. कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढत आहे. (Gold – Silver Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community