कोव्हिड काळात कोव्हिड प्रतिबंधक लस निर्मिती सुरू झाली. आणि ॲस्ट्राझिनिका कंपनीने पहिली लस बाजारात आणली. या लशीचं भारतातील उत्पादन कोव्हिशिल्ड नावाने सुरू झालं ते पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये. तेव्हापासून सिरम इन्स्टिट्यूच आणि तिचे मालक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla Net Worth) यांना लससम्राटच म्हटलं जातं. अर्थात, त्यांच्या संस्थेत आधीपासून सुरू असलेल्या संशोधनपर कामामुळे कोव्हिशिल्डचं काम त्यांच्यासाठी नवीन नव्हतंच. किंबहुना देशात ते आधीपासूनच लससम्राट होते.
असे हे उद्योजक सायरस पुनावाला कोव्हिड पूर्वी त्यांच्या मुंबईतील लिंकन हाऊस या घरामुळे प्रकाशझोतात आले होते. अमेरिकन दूतावासाकडून हे घर त्यांनी तब्बल ९३४ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. २०१५ मध्ये झालेला हा व्यवहार चांगलाच गाजला. मुंबईत बीच कँडीला असलेलं हे घर तेव्हाचं मुंबईतील सगळ्यात महागडं निवासी घर होतं. ब्रिटिशांनी १९३३ मध्ये ते घर वाणकनेरचे महाराजा अमरसिंगजी यांच्यासाठी बांधलं. आणि त्यांनी ते अमेरिकन सरकारला भाडेतत्त्व करारावर दिलं होतं. अमेरिकन दूतावासाने २०११ मध्ये घराचा लिलाव केला. आणि तेव्हा सायरस पुनावाला यांनी ९३४ कोटी रुपये मोजून हे घर खरेदी केलं.
५०,००० वर्ग फुटांचं हे घर आहे. सायरस पुनावाला हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यामुळे ते त्यांचा मुलगा आदर, मुलाची पत्नी नताशा आणि दोन नातवंडं अशी सगळी पुण्यात आदर आबाद पुनावाला हाऊस या फार्महाऊसमध्ये राहतात. पण, मुंबईत असतील तर हे कुटुंबं लिंकन हाऊसमध्येच राहतं. सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla Net Worth) यांनी देशातील सगळ्यात मोठा आरोग्यसेवा विषयक उद्योजक म्हणून नाव कमावलं आहे. त्यांची एकूण मालमत्ता २७ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. आणि देशातच नाही तर जगभरातील ते पहिल्या क्रमांकाचे हेल्थकेअर उद्योजक आहेत. भारतात श्रीमंतांच्या यादीत त्यांचा तिसरा क्रमांक लागतो.
Join Our WhatsApp Community