न्यायालयीन लढ्यासाठी सरकारने कोणतीही मदत केली नाही, Vinesh Phogat च्या आरोपावर काय आहे वकील हरीश साळवेंचा खुलासा?

229
न्यायालयीन लढ्यासाठी सरकारने कोणतीही मदत केली नाही, Vinesh Phogat च्या आरोपावर काय आहे वकील हरीश साळवेंचा खुलासा?
न्यायालयीन लढ्यासाठी सरकारने कोणतीही मदत केली नाही, Vinesh Phogat च्या आरोपावर काय आहे वकील हरीश साळवेंचा खुलासा?
  • ऋजुता लुकतुके

विनेश फोगाटसाठी (Vinesh Phogat) यंदाचा पॅऱिस ऑलिम्पिकचा अनुभव वेदनादायी होता. ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठूनही शेवटच्या क्षणी १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ती अपात्र ठरली. आणि तिचं पदक हुकलं. त्यानंतर अपात्रतेविरुद्ध विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दादही मागितली. पण, तिथे तिचं अपील फेटाळण्यात आलं. या धक्यानंतर भारतात परतलेल्या विनेशने कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. आणि अलीकडे एका मुलाखतीत तिने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून आपल्याला कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला होता.

‘पी टी उषा (P. T. Usha) मॅडम रुग्णालयात भेटायला आल्या. त्यांनी फोटो काढला, तो सोशल मीडियावर टाकला. पण, त्याव्यतिरिक्त कुठलीही मदत त्यांनी केली नाही,’ असं वक्तव्, विनेशने केलं होतं. यावर आता भारताचे सॉलिसिटर जनरल आणि विनेशची क्रीडा लवादासमोर बाजू मांडणारे वकील हरिष साळवे (Harish Salve) यांनी उत्तर दिलं आहे.

(हेही वाचा – बहिणींच्या डोळ्यातील आनंद सांगतो; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- CM Eknath Shinde)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना साळवे म्हणाले की, क्रीडा न्यायालयाच्या निर्णयाला स्विस न्यायालयात आव्हान द्यायचे होते. मात्र विनेशने तिच्या वकिलांच्या माध्यमातून याप्रकरणी पुढील कारवाई करण्यास नकार दिला. साळवे यांनी क्रीडा न्यायालयात रौप्य पदकासाठी विनेशच्या बाजूने वकिली केली होती.

साळवे यांचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण काही दिवसांपूर्वी विनेश फोगटने (Vinesh Phogat) एका मुलाखतीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले होते. तिने स्वत:च क्रीडा न्यायालयात खटला दाखल केला होता. भारतीय संघाने तिला त्याची माहितीही दिली नव्हती.

‘पी टी उषांवर (P. T. Usha) केलेल्या आरोपांबाबत त्याच माहिती देऊ शकतील. पण, मला असलेली माहिती अशी की, विनेशने स्वत:ही वकील नेमले होते. आणि आयओएनं नेमलेल्या वकिलांना ते पुरेशी माहिती पुरवत नव्हते. मी कोर्टात बाजू मांडणार होतो. मलाही पुरेशी माहिती नव्हती. सुरुवातीला समन्वयाचा अभाव होता. पुढे तो दूर झाला. हे प्रकरण आयओए आणि विनेशमधील होतं. यात सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. कारण, आयओए स्वतंत्र संस्था आहे,’ असं साळवे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.