Arvind Kejriwal यांची मोठी घोषणा, म्हणाले- येत्या दोन दिवसांनी… 

205
Arvind Kejriwal यांची मोठी घोषणा, म्हणाले- येत्या दोन दिवसांनी... 
Arvind Kejriwal यांची मोठी घोषणा, म्हणाले- येत्या दोन दिवसांनी... 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे.” जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घरात आणि गल्लीत जाईन आणि जोपर्यंत मला जनतेकडून निर्णय मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –Dhule Car Accident : धुळ्यात भीषण अपघात! पिकअप व्हॅन आणि ईको कारमध्ये धडक; ५ जण ठार, ४ गंभीर जखमी )

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्यावर काही निर्बंध टाकले होते. मुख्यमंत्री म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित प्रस्तावाला नायब राज्यपालांकडून मंजुरी घेण्याची अट घातली होती. याशिवाय, केजरीवाल यांना दिल्लीतील सचिवालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता थेट जनतेमध्ये जाणार असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया (Manish Sisodia) दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. जनतेला मी इमानदार वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी बेईमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – विरोधी पक्षाकडून देण्यात आली होती पंतप्रधान पदाची ऑफर; Nitin Gadkari यांचा गौप्यस्फोट)

येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवार यांच्या या घोषणेचे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि दिल्लीच्या जनतेमध्ये काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.