शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबध्द आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. कृषी उत्पन्न (Agricultural income) आणि ग्रामीण रोजगार (Rural employment) वाढविण्याच्या उद्देशाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करणे असो किंवा खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवणे असो, अशा निर्णयांमुळे आपल्या अन्नदात्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयांमुळे त्यांचे उत्पन्न वाढणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत.
(हेही वाचा – Arvind Kejriwal यांची मोठी घोषणा, म्हणाले- येत्या दोन दिवसांनी… )
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर काय लिहिले?
’देशाच्या खाद्य सुरक्षेसाठी रात्रंदिवस परिश्रम करणाऱ्या आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे हित साधण्यासाठी आमचे सरकार कोणतीही कसर ठेवत नाही. मग यामध्ये कांदा निर्यातीवरील शुल्क कमी करणे असो अथवा खाद्य तेलांवरील आयात शुल्क वाढविणे असो, आम्ही घेतलेल्या अशा अनेक निर्णयांचा खूप मोठा लाभ आपल्या अन्नदाता शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे एकीकडे त्यांचे उत्पन्न वाढेल, तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधीही वाढतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community