संभाजी ब्रिगेडच्या वाशी येथील कार्यक्रमात बोलताना तथाकथित ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते. महाराव यांनी हिंदू देवतांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यभर हिंदूंकडून निषेध आंदोलने सुरु आहेत. त्यानुसार रविवार, १५ सप्टेंबर रोजी राजगुरूनगर येथेही हिंदूंनी महाराव (Dnyanesh Maharao) यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला.
अटकेची मागणी
राजगुरुनगरमध्ये राजगुरुनगर सकल हिंदू समाजतर्फे ज्ञानेश महारावांच्या (Dnyanesh Maharao) विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. ज्ञानेश महारावांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविरुद्ध अपमानजनक विधाने केले असून हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आंदोलक हिंदूंनी केला. या निषेध रॅलीला शेकडो पुरुष आणि महिलांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नितिन वाटकर यांनी ज्ञानेश महारावांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. या आंदोलनाद्वारे हिंदू समाजाने एकजुटीचा परिचय दिला आणि ज्ञानेश महारावांविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा American Hinduism : हिंदुत्वाचा अमेरिकेतला आवाज; ‘या’ भारतीय वंशाच्या लेखकाबद्दल जाणून घ्या!)
कोल्हापूरनंतर पुण्यात गुन्हा दाखल
ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या हिंदू देवतांच्या अवमानाच्या विरोधात त्यांच्या विरोधात सर्व प्रथम कोल्हापूर येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community