राज्यात दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक; CM Eknath Shinde यांनी दिले संकेत

167

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार आहे, अशा वेळी सरकार मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणार कि मुदत संपल्यावर १ महिना उशिरा निवडणूक घेणार, यावर मतमतांतरे होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निवडणुका दिवाळीपूर्वी घेण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. ‘हिंदुस्थान पोस्ट’ नेही याविषयीचे वृत्त सर्वात आधी दिले होते.

आचारसंहिता १५ दिवसात लागणार

गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्ये, अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती आणि २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते, तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित करण्यात आला होता. यावेळीही साधारण २५-३० सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे, तसेच कदाचित निवडणूक एकाच टप्प्यात होईल, असे वृत्त हिंदुस्थान पोस्टने दिले होते.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही १२ नोव्हेंबरच्या आसपास राज्यात विधानसभा निवडणूक होईल, असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. परंतु २९ ऑगस्टला गुप्तचर विभागातील सुत्रांच्या हवाल्याने दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे वृत्त आहे. १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होणार असल्याचे समजते. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. ती एकाच टप्प्यात झालेली होती. महाराष्ट्र, हरयाणात एकाचवेळी निवडणूक झाली. पण यंदा हरयाणात आधी निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच (CM Eknath Shinde) याबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

(हेही वाचा Mumbai Local : मुंबईकरांना मोठा दिलासा; तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या होणार दुप्पट)

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आगोयाकडून हालचाली सुरु होतील. राज्यात मागील अनेक वर्ष एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. पण सध्या राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. २००४ पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.