हरियाणात सरकारी शाळेत हिंदु मुलींना घालायला लावला Hijab; हिंदुत्ववादी संतप्त

हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी शाळेमध्‍ये पोचले. त्‍या वेळी त्‍यांनी ‘हिंदु मुलींवर इस्‍लाम थोपवला जात आहे. हा हिंदु धर्माचा अपमान आहे’, असे सांगितले.

206
जिल्‍ह्यातील बडौली गावातील सरकारी शाळेमध्‍ये हिंदु मुलींना हिजाब (Hijab) घालायला लावले. याविषयीचा व्‍हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये हिजाब (Hijab) घातलेल्या मुली दिसत असून त्‍या नमाजपठण करतांना दिसत आहेत. त्‍यानंतर काही मुली ईदच्‍या दिवशी ज्‍या प्रमाणे एकमेकांना आलिंगन दिले जाते, त्‍याप्रमाणे आलिंगन देत असतांना दिसत आहे.

ईदच्या निमित्ताने शाळेत आयोजित केलेला कार्यक्रम 

या व्हिडिओनंतर संतप्‍त झालेले हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी शाळेमध्‍ये पोचले. त्‍या वेळी त्‍यांनी ‘हिंदु मुलींवर इस्‍लाम थोपवला जात आहे. हा हिंदु धर्माचा अपमान आहे’, असे सांगितले. हिंदूंच्‍या तीव्र विरोधानंतर मुख्‍याध्‍यापकांनी हिंदूंची क्षमा मागितली. हिंदु संघटनांनी याला तीव्र विरोध केल्‍यावर शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी याविषयी स्‍पष्‍टीकरण दिले. ‘ईदच्‍या निमित्ताने शाळेत कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. मुलांमध्‍ये सर्वधर्मसमभावाची जोपासना होण्‍यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात एक नाटक बसवण्‍यात आले. त्‍या वेळी मुलींना हिजाब (Hijab) घालण्‍यास सांगण्‍यात आले. मुख्‍याध्‍यापकांनी हे स्‍पष्‍टीकरण देऊनही हिंदु संघटनांच्‍या प्रतिनिधींवर त्‍याचा काहीही परिणाम झाला नाही. त्‍यानंतर मुख्‍याध्‍यापकांनी क्षमा मागितली, तसेच ‘असे कार्यक्रम परत आयोजित करणार नाही’, असे आश्‍वासन दिले. त्‍यानंतरही हिंदु संघटनांनी ‘या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या शिक्षकांचे स्‍थानांतर करा’, अशी मागणी केली. या प्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांनी शाळेकडून अहवाल मागवला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.