Halal : प्रत्येक गोष्टीत ‘हलाल’ आणण्यासाठी कार्यरत धूर्त धर्मांध!

188
Halal : प्रत्येक गोष्टीत ‘हलाल’ आणण्यासाठी कार्यरत धूर्त धर्मांध!
  • रमेश शिंदे

‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शाकाहारी खाद्यपदार्थांपासून सौंदर्यप्रसाधनापर्यंत आणि औषधांपासून पर्यटनापर्यंत सर्वांसाठी लागू झाले आहे. पूर्वी इस्लामनुसार ज्या गोष्टी ‘हराम’ होत्या त्या काळानुसार पैसे आणि धर्मप्रसार यांसाठी मुसलमानांनी ‘हलाल’ ठरवल्या! जसे सौंदर्यप्रसाधने वापरणे हराम असूनही त्याला हलाल (Halal) प्रमाणपत्र देण्यात आले.

(हेही वाचा – Vasaicha Raja : ‘वसईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या नैवेद्य स्पर्धा आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठाणाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद)

१. सुप्रसिद्ध ‘हल्दीराम’चे शुद्ध शाकाहारी ‘नमकीन’सुद्धा आता हलाल प्रमाणित झाले आहे. सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, मध, तुलसी अर्क यांचाही त्यात समावेश झाला.
२. यात धान्य, तेल यांपासून ते साबण, शाम्पू, टूथपेस्ट, काजळ, नेलपॉलिश, लिपस्टिक आदि सौंदर्यप्रसाधनांचाही समावेश झाला आहे.
३. युनानी, आयुर्वेदिक इत्यादि औषधे यांतही हलालची (Halal) संकल्पना आली आहे.
४. हलाल गृहसंकुल : केरळ राज्यातील कोची शहरात भारतातील पहिले शरियतच्या नियमांच्या आधारे हलाल प्रमाणित गृहसंकुल बनत आहे. यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे जलतरण तलाव, वेगवेगळी प्रार्थनाघरे, काबाच्या दिशेपासून दूर असणारी शौचालये, नमाजाच्या वेळा दाखवणारी घड्याळे, प्रत्येक घरात नमाज ऐकू येण्याची व्यवस्था अशा विविध सुविधांचा अन् शरियतच्या नियमांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
५. हलाल रुग्णालय : तामिळनाडूतील चेन्नई शहरातील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालयाला हलाल प्रमाणित घोषित करण्यात आले आहे. त्यांचा दावा आहे की, इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता आणि आहार आम्ही देतो.
६. हलाल ‘डेटिंग वेबसाईट’ : संकेतस्थळांवर युवक-युवतींना परिचय करून देणारी, त्यातून मैत्री, तसेच भेटी घडवणारी अनेक संकेतस्थळे आहेत. यातही इस्लामच्या शरियतवर आधारीत ‘हलाल डेटिंग वेबसाईट्स’ चालू करण्यात आल्या आहेत. यात ‘मिंगल’ हे एक मुख्य संकेतस्थळ आहे.

(हेही वाचा – Rajasthan मध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुसलमानांचे धाबे दणाणले; सरकारने बुलडोझर फिरवण्यास केली सुरुवात)

थोडक्यात काय, तर जगासह भारत इस्लामी हलालद्वारे (Halal) ‘आर्थिक जिहाद’ची शिकार झाला आहे आणि आपण याबद्दल अनभिज्ञ आहोत; कारण आपण झोपलेले आहोत.

(लेखक हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.