आणखी ४८ तास कशाला हवेत? राजीनामा देण्यावरून भाजपाचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा

160
आणखी ४८ तास कशाला हवेत? राजीनामा देण्यावरून भाजपाचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा
आणखी ४८ तास कशाला हवेत? राजीनामा देण्यावरून भाजपाचा Arvind Kejriwal यांच्यावर निशाणा

दारू घोटाळ्यांसंबंधी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच ४८ तासांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा का नाही दिला. यावरून भाजपाने (BJP) प्रश्न उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजपाने उपस्थित केला. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – Rajasthan मध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुसलमानांचे धाबे दणाणले; सरकारने बुलडोझर फिरवण्यास केली सुरुवात)

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना (Delhi CM) राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अवधी का लागतो, असा सवाल भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी (BJP leader Sudhanshu Trivedi) यांनी पत्रकार परिषदेत केला. या ४८ तासांत केजरीवाल काय तोडगा काढणार आहेत? त्रिवेदी म्हणाले की, केजरीवाल कोणत्याही फाईलवर सही करू शकत नाहीत. केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे, ते ना कार्यालयात जाऊ शकतात ना कोणत्याही फाईलवर सही करू शकतात. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे म्हणजे केजरीवाल यांनी आपला गुन्हा मान्य केला आहे का? असा सवाल देखील भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी उपस्थित केला. 

तुरुंगात असताना का नाही दिला राजीनामा?
केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी (BJP leader Sudhanshu Trivedi) यांनी प्रश्न उपस्थित करत, “केजरीवाल यांनी तुरुंगात असतानाच राजीनामा का दिली नाही? की केजरीवाल यांना बाहेर येऊन काही सेटल करायचे होते का? यामुळे तुरुंगातून राजीनामा देत नव्हते. 

(हेही वाचा – Rajasthan मध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुसलमानांचे धाबे दणाणले; सरकारने बुलडोझर फिरवण्यास केली सुरुवात)

‘…म्हणून केली राजीनाम्याची घोषणा’
सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) फुटीचे वातावरण तयार झाले आहे. हे सांभाळण्यासाठी केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, आम आदमी पक्षासाठी आपल्या नेत्यांना संभाळणे अवघड होत आहे. या मजबुरीतूनच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

हेही पाहा –


 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.