आता निवृत्त न्यायाधीशांऐवजी तरुण वकिलांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केले जातेय; CJI D Y Chandrachud यांची माहिती

माझ्या मते चांगले मध्यस्थ न्यायाधीशही बनू शकतात. म्हणूनच बऱ्याच बारच्या सदस्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) म्हणाले.

155

तरुण भारतीय वकिलांमध्ये भरपूर प्रतिभा आहे, त्यामुळे केवळ निवृत्त न्यायाधीशांना मध्यस्थ म्हणून नियुक्त करण्याचा कल आता कमी होत आहे, असे भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) म्हणाले. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने 45 पैकी किमान 23 वकील हे तरुण होते, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

(हेही वाचा मुंबईत पुन्हा Hit and Run; दहिसरमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवले; दोघे गंभीर जखमी, एकाचा मृत्यू)

याआधी मध्यस्थ म्हणून माझी पहिली पसंती निवृत्त न्यायाधीशाची होती, कारण आम्ही आमच्या पूर्वीच्या सवयीनुसार वागत होतो. पण आता आम्ही यात बदल करत आहोत, तरुण प्रतिभावंत वकिलांना मध्यस्थ म्हणून नियुक्त करत आहोत. माझ्या मते चांगले मध्यस्थ न्यायाधीशही बनू शकतात. म्हणूनच बऱ्याच बारच्या सदस्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) म्हणाले.

आंतरराष्ट्रीय लवादाचा पुरेसा अनुभव असलेल्या उच्च न्यायालयांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे लवादाचे वरिष्ठ न्यायालय म्हणून नियुक्त केले जात आहे. निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​म्हणाले, वकील कपिल सिब्बल यांनी सिंधू जल करार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सागरी सीमा प्रकरण आणि इटालियन सागरी प्रकरणासह अनेक राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये मध्यस्थ म्हणून उत्तम हाताळली आहेत, असे सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.