८-१० दिवसांत महायुतीतील जागावाटप होणार निश्चित; CM Eknath Shinde काय म्हणाले…

338
कांदा साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा; CM Eknath Shinde यांचे सक्त आदेश
राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणे अपेक्षित असून सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये जागावाटप येत्या ८ ते १० दिवसांत निश्चित केले जाईल.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, २८८ सदस्यांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान सोयस्कर असेल. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात असा अंदाज देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena), भाजपा (bjp) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा (nationalist congress party) समावेश असलेले महायुती सरकार विकास आणि कल्याणकारी उपाययोजनांवर भर देत असून त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यातील निवडणूक सोयस्कर असून, आठ ते दहा दिवसांत जागावाटप निश्चित होणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. (CM Eknath Shinde)
स्ट्राईक रेट आणि क्षमता हाच क्रायटेरिया
महायुतीमध्ये (mahayuti) जागावाटपाचा एकमेव क्रायटेरिया आहे तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता.जो ज्या जागेवर निवडून येऊ शकतो त्या पक्षाला त्या उमेदवाराला ती जागा सोडली जाईल.तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा स्ट्राईक रेट देखील लक्षात घेतला जाईल. (CM Eknath Shinde)
‘दीड लाख तरुणांना नोकरीसाठी नियुक्तीपत्रे’
कुशल प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोकरीसाठी दीड लाख तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून त्यासाठी त्यांना ६ हजार ते १० हजार रुपये स्टायपेंड मिळेल. १० लाख तरुणांना कव्हर करण्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या महिला लाभार्थ्यांना दरमहा दिड हजार रूपये मिळतात. सरकारच्या लाडकी बहिन योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी ६० लाख महिलांना आर्थिक मदत मिळाली असून, “आम्ही अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याची योजना आखत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  (CM Eknath Shinde)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.