देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता – Nitin Gadkari

Nitin Gadkari : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात 'सीओईपी जीवनगौरव आणि सीओईपी अभिमान पुरस्कार’ वितरण

73
देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता - Nitin Gadkari
देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता - Nitin Gadkari

देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता आहे. या कार्यात अभियांत्रिकी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून या क्षेत्रात नागरिकांच्या गरजेशी संबंधित तंत्रज्ञानावर संशोधनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा- Cyber Crime : मुंबई उच्च न्यायालयाच्या नावेच फसवणूक; सायबर चोरट्यांचा पावणेबारा लाख रुपयांवर डल्ला)

पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी अभियांत्रिकी माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित अभियंता दिन कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, नियामक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे मानद सचिव डॉ. सुजीत परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. (Nitin Gadkari)

(हेही वाचा- Jammu-Kashmir विधानसभा निवडणुकीवर आतंकवादाचे सावट)

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari)  यांच्या हस्ते यंदाचा ‘सीओईपी जीवनगौरव पुरस्कार’ हा भगवती स्फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. एन. भगवती (P. N. Bhagwati) यांना प्रदान करण्यात आला. तर COEP अभिमान पुरस्कार हा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्रालयातील प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीम येथील कॅबिनेट मंत्री राजू बस्नेत, जेपी मॉर्गन चेसच्या व्यवस्थापकीय संचालक मोनिका पनपलिया, टेस्ला मोटर्सचे वरीष्ठ संचालक हृषिकेश सागर आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांना देण्यात आला.

आपल्या भाषणात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सर्वप्रथम सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो, असे एम. विश्वेश्वरय्या यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण केले. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही संशोधन कार्यात गरज, आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्र अथवा परिसराच्या गरजेनुसार संशोधन केल्यास त्याचा समाजाला चांगला फायदा होऊ शकतो. अर्थात कचऱ्याची समस्या असलेल्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासोबतच त्याच्यावर प्रक्रिया करून हायड्रोजन निर्मिती करण्यासारखे प्रकल्प उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही संशोधनात सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतर हे अंतिम ध्येय असले पाहिजे. रोजगाराची निर्मिती करून गरिबी हटवणारे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात आणणे आवश्यक आहे. या कार्यात अभियांत्रिकी क्षेत्राची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे, कारण हे संपूर्ण कार्य अभियंत्यांच्या मार्फतच केले जाणार आहे.

(हेही वाचा- Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत वाहतुकीत बदल)

नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ध्येयानुसार आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी स्वदेशीचे मूलमंत्र आपण अंगिकारला पाहिजे. आजही सुमारे बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात, तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला आपणास पाठबळ द्यावेच लागेल. गेल्या काही काळात शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या असून आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करीत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील आणि त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.

(हेही वाचा- नोव्हेंबरच्या कोणत्या दिवशी होणार निवडणुका ? CM Eknath Shinde यांनी दिला जागा वाटपावर अपडेट!)

ऑटोमोबाईल क्षेत्रातही भारताची वाटचाल अत्यंत वेगाने होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केल्यास भारत नुकतेच जपानला मागे टाकून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेतील ऑटोमोबाईल उद्योग हा सुमारे 78 लाख कोटी रुपयांचा आहे, दुसऱ्या क्रमांकावरील चीनमध्ये हा आकडा 44 लाख कोटी रुपये इतका आहे. तर, भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचे क्षेत्र हे 22 लाख कोटी रुपयांचे असून आगामी काळात त्यामध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिरमध्ये लिथियमचा साठा सापडल्यामुळे भविष्यात सेमीकंडक्टरच्या बाबतीतही भारत मोठा उत्पादक देश बनेल. महामार्गांच्या बाबतीतही देशात योग्य दिशेने काम सुरू असून महाराष्ट्रात अटल सेतू मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडण्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी दिली.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.