-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) डायमंड्स लीगच्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. ८७.८६ मीटरच्या फेकीसह तो दुसऱ्या स्थानावर राहिला. तर अँडरसन पीटर्स ८७.८७ मीटरच्या फेकीसह पहिला आला. म्हणजेच नीरजचं सुवर्ण फक्त ०.०१ मीटरनी हुकलं. पण, त्याहून मोठी एक गोष्ट सामन्यानंतर उघड झाली आहे. अंतिम फेरीत नीरज डाव्या हाताला बँडेज बांधून खेळताना दिसला. प्रत्यक्षात त्याच्या डाव्या हाताच्या बोटांचं हाड मोडलं होतं. त्याला बारिकसा छेद गेला होता. त्याही परिस्थितीत नीरज स्पर्धा खेळला. त्यात दुसराही आला.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच सरावा दरम्यान त्याचा हात दुखावल्याचं त्याने नंतर सांगितलं. ‘सोमवारी सरावावेळी माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली. नंतर क्ष-किरण तपासणीत असं दिसलं की, डाव्या हाताच्या चौथ्या बोटाचं हाड मोडलं होतं. तो खूपच वेदनादायी अनुभव होता. पण, आणखी एका आव्हानाला माझ्या वैद्यकीय चमूच्या मदतीने मी उत्तर देऊ शकतो. स्पर्धेत मी त्यांच्यामुळेच उतरु शकतो,’ असं स्पर्धेनंतर नीरजने स्पष्ट केलं. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतकरी आणि मजूर यांच्या बळकटीकरणाची आवश्यकता – Nitin Gadkari)
‘ही हंगामातील शेवटची स्पर्धा होती. म्हणूनच मला ती खेळायची होती. या एकूणच हंगामात माझी कामगिरी मनासारखी झालेली नाही. पण, मी बरंच काही शिकलो आहे. त्यामुळे नवीन हंगामात मी परतेन, तोच पूर्ण तंदुरुस्त होऊन आणि अधिक चांगली तयारी करूनच,’ असं शेवटी नीरज म्हणाला. (Neeraj Chopra)
As the 2024 season ends, I look back on everything I’ve learned through the year – about improvement, setbacks, mentality and more.
On Monday, I injured myself in practice and x-rays showed that I had fractured the fourth metacarpal in my left hand. It was another painful… pic.twitter.com/H8nRkUkaNM
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 15, 2024
नीरज चोप्राला (Neeraj Chopra) या हंगामात जांघेच्या स्नायूच्या दुखापतीने सतावलं आहे. ही दुखापत वारंवार उचल खात आहे. त्यामुळे ९० मीटर फेक तो साध्य करू शकलेला नाही. खरंतर त्याने यंदा ९० मीटरचंच उद्दिष्टं ठेवलं होतं. आताही ऑलिम्पिक पूर्वी डायमंड्स लीगच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. ऑलिम्पिकमध्येही त्याच्या हालचाली पूर्णपणे नैसर्गिक नव्हत्या. अशावेळी डायमंड्स लीगच्या अंतिम स्पर्धेला डोळ्यासमोर ठेवून नीरजने उपचार थोडे पुढे ढकलले होते. आता हंगाम संपल्यावर तो थेट वैद्यकीय सल्ला घेणार आहे.
(हेही वाचा- Ind vs Pak Hockey Match : आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत, पाक खेळाडूंमध्ये मैदानातच जुंपली)
डायमंड्स लीग ही ॲथलेटिक्समधील सर्वोच्च स्पर्धा आहे. दरवर्षी या लीगचे काही ठरावीक टप्पे जागतिक स्तरावर पार पडतात. त्यात सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करतात. ऑलिम्पिकच्या खालोखाल मानाची अशी ही स्पर्धा आहे. टेनिसमधील एटीपी टूअर, बॅडमिंटनमधील सुपर सीरिज यांच्या दर्जाची ही स्पर्धा आहे. यंदा सहापैकी २ लीग स्पर्धा नीरज दुखापतीमुळे खेळूच शकला नव्हता. तरीही त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अखेर रौप्य पदकही जिंकून दाखवलं. (Neeraj Chopra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community