Maruti Dzire 2024 : मारुतीच्या नवीन डिझायर गाडीत आहे हे नवीन लोकप्रिय फिचर 

Maruti Dzire 2024 : मारुतीची नवीन डिझायर गाडी सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच होत आहे 

90
Maruti Dzire 2024 : मारुतीच्या नवीन डिझायर गाडीत आहे हे नवीन लोकप्रिय फिचर 
Maruti Dzire 2024 : मारुतीच्या नवीन डिझायर गाडीत आहे हे नवीन लोकप्रिय फिचर 
  • ऋजुता लुकतुके 

मारुतीच्या नवीन डिझायर गाडीची चर्चा भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच सुरू झाली आहे. गाडीचा लुक काही प्रमाणात बदलणारं एक फिचर या गाडीत समाविष्ट झालं आहे. आधीच्या मारुती सेडान गाड्यांना सनरुफ नव्हतं. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात हे फिचर लोकप्रिय आहे. त्यामुळे आपल्या देशी कंपनीनेही आता डिझायरमध्ये सनरुफ आणलं आहे. ते पॅनोरमिक नसलं तरी तुमच्या सफरीची रंगत वाढवणारं नक्कीच आहे.  (Maruti Dzire 2024)

बाकी मारुती स्विफ्ट डिझायरच्या चौथ्या पिढीतील कार खास भारतीय बाजारपेठेसाठी बनलीय. भारतात कार लाँच होण्यापूर्वीच तिची हवा तयार झाली आहे.. आता हायब्रिड कारही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. कुटुंबाची कार असा लौकिक भारतीय बाजारपेठेत मारुतीने मिळवला आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात या कारचं दर्शन लोकांना झालेलं होतं. आणि गेल्यावर्षी या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह भारतीय रस्त्यांवरही सुरू होत्या. अशा चाचण्यांच्यावेळी दिसलेल्या कारवरून ती कशी असेल याचा चांगला अंदाज बांधता येतो. आधीच्या स्विफ्टच्या मानाने नवीन गाडीच्या इंटिरिअरमध्ये बरेच बदल झाले आहेत. (Maruti Dzire 2024)

(हेही वाचा- Ind vs Pak Hockey Match : आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत, पाक खेळाडूंमध्ये मैदानातच जुंपली)

गाडीतील इन्फोटेनमेंट डिस्प्ले ९ इंचांचा आहे. एसी व्हेंट नवीन आणि जास्त प्रभावी आहेत. डॅशबोर्डही नवीन आहे. गाडीचा लुकही थोडाफार बदलला आहे. आणि जुन्या इंग्लिश गाडीचा व्हिंटेज लुक तिला आहे. खासकरून मागच्या बाजूने. गाडीचं ग्रील बदललंय. बंपरही आधुनिक आहे. शिवाय मागच्या सीटचं दार उघडण्यासाठीचं हँडल आता दरवाजालाच देण्यात आलं आहे. (Maruti Dzire 2024)

 चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडीत ६ एअरबॅग आहेत. चालकाच्या सुरक्षेसाठी एबीएस प्रणाली आहे. तर मुलांच्या सीटसाठीही विशेष सुरक्षा आहे. नवीन स्विफ्टचं इंजिनही बदलण्यात आलंय. नवीन गाडीत आहे १.३ पेट्रोल इंजिन, ज्याला ३ सिलिंडर जोडण्यात आलेत. ५ स्पीड मॅन्युअल तसंच ऑटोगिअर बॉक्सचा पर्याय तुम्हाला देण्यात आलाय. भारतात एप्रिल महिन्यात नवीन स्विफ्ट लाँच होऊ शकते. (Maruti Dzire 2024)

(हेही वाचा- आली निवडणूक घ्या बाप्पांचे दर्शन… स्वताला निधर्मवादी म्हणवणारे Pawar family बाप्पांच्या दर्शनात लीन. )

गाडीची किंमत ७ लाख रुपयांपासून सुरू होईल. आणि या गाडीची स्पर्धा असेल ती ह्युंदे आय२० निऑसशी. (Maruti Dzire 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.