Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदलणार, काय आहे नवीन नाव?

165
Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदलणार, काय आहे नवीन नाव?
Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदलणार, काय आहे नवीन नाव?

पहिली वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro Train) रुळांवर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वंदे मेट्रो ट्रेनच्या उद्घाटनापूर्वीच रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. झेंडा दाखवण्यापूर्वी रेल्वेने वंदे मेट्रोचे नाव बदलले. या ट्रेनचे नाव वंदे मेट्रो वरून बदलून नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) असे करण्यात आले आहे.

नमो भारत रॅपिड ट्रेनची वेळ काय असेल?

ही ट्रेन भुज ते अहमदाबाद हे अंतर ५ तास ४५ मिनिटांत पूर्ण करेल. ही ट्रेन भुजहून सकाळी 05.05 वाजता सुटेल आणि अहमदाबादला सकाळी 10.50 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे अहमदाबादहून संध्याकाळी 05.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.10 वाजता भुजला पोहोचेल. (Vande Metro Train)

वेग, भाडे किती असेल?
12 डबे असलेल्या या ट्रेनमध्ये 1,150 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. हिरवी झेंडा दाखविल्यानंतर 17 सप्टेंबरपासून या ट्रेनचा नियमित प्रवास सुरू होणार आहे. अहमदाबाद ते भुजचे भाडे 455 रुपये असेल. ताशी 110 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन 359 किमीचे अंतर 5 तास 49 मिनिटांत पूर्ण करेल. (Vande Metro Train)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.