- ऋजुता लुकतुके
निस्सान कंपनीने २०२५ पर्यंत भारतीय बाजारपेठेवर खास लक्ष केंद्रीत केलं आहे. वर्षभरात कंपनी एक एसयुव्ही, एक एमपीव्ही आणि एक्स ट्रेल या गाड्या बाजारात आणणार आहे. यापैकी एमपीव्ही गाडीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. कारण, भारतीय बाजारात मारुती इर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा या दोन गाड्यांनी सध्या एमपीव्ही बाजारपेठ व्यापली आहे. आणि इथं स्पर्धेला चांगला वाव आहे. तिथेच निस्सान कंपनी शिरकाव करण्याच्या तयारीत आहे. एमपीव्ही म्हणजे मल्टी पर्पज व्हेहिकल. भारतात रेनॉ कंपनीबरोबर करार करून निस्सान नवीन एमपीव्ही आणणार आहे. (Nissan Compact MPV)
रेनॉच्या ट्रिबर गाडीवर आधारित अशी ही नवीन गाडी असणार आहे. डिझाईन हे निस्सान मॅग्नेटच्या जवळ जाणारं असेल. गाडीत सात जण बसू शकतील. जीवनशैली म्हणजेच काहीशा प्रिमिअम श्रेणीत ही कार निस्सान लाँच करेल हे नक्की. म्हणजेच चावीशिवाय तुम्ही गाडीत प्रवेश करू शकाल. एका बटणाच्या क्लिकवर गाडी स्टार्ट होईल. पाठीमागच्या सीटही रिक्लायनर असतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतही एसी व्हेंट असतील. आणि कारचे दिवे आता एलईडी असतील. चालकासमोर ८ इंचांचा मोठा डिजिटल डिस्प्ले असेल. तर ॲपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोने कार फोनलाही जोडलेली असेल. (Nissan Compact MPV)
New Nissan 7 Seater MPV Launch Confirmed – Based On Triber https://t.co/N7YvgMjtlx pic.twitter.com/84ELp8QiUB
— RushLane (@rushlane) February 6, 2023
(हेही वाचा – Bandra Worli Sea-Link वर BMW व Mercedes ची शर्यत! भीषण अपघातात टॅक्सी उलटली)
गाडीच्या इंजिनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. ट्रिबरचंच इंजीन या गाडीतही वापरण्यात येईल. १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजीन या गाडीत असेल. या इंजिनाला जागा कमी लागत असल्यामुळे ट्रिबर प्रमाणेच निस्सान एमपीव्ही गाडीचंही बोनेट आकाराने लहान असेल. ३ सिलिंटर असलेलं हे इंजिन ७२ बीएचपी इतकी ताकद निर्माण करू शकेल. या गाडीची अधिक सखोल माहिती अजून उपलब्ध नाही. पण, ट्रिबर प्रमाणेच ६ ते ८ लाखांच्या दरम्यान ही गाडी उपलब्ध असेल. (Nissan Compact MPV)
वर म्हटल्याप्रमाणेच मारुती इर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा या गाड्यांची निस्सान एमपीव्हीशी स्पर्धा असेल. पण, ही बाजारपेठही विस्तारतेय. कियासह इतरही कंपन्या आपल्या एमपीव्ही गाड्यांवर मेहनत घेत आहेत. त्यामुळे लाँचची वेळ, किंमत हे सगळं महत्त्वाचं ठरणार आहे. (Nissan Compact MPV)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community