- ऋजुता लुकतुके
जवळ जवळ सगळ्याच जागतिक कारमेकिंग कंपन्यांनी सध्या भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. स्कोडानेही अलीकडेच काही धोरणात्मक नवीन निर्णय घेतले आहेत. भारतातून सुपर्ब आणि ऑक्टेविया या दोन गाड्या हद्दपार झाल्या आहेत. कंपनीची वाटचाल अधिक प्रिमिअर गाड्यांच्या दिशेनं होत आहे. कुशाक नंतर आता कंपनी भारतीय रस्त्यांसाठी कॅडियाकची तयारी करत आहे. आतापर्यंतची ही कंपनीची सगळ्यात प्रिमिअम श्रेणी असेल. एसयुव्ही प्रकारची ही गाडी १.५ लीटर इंजिन क्षमतेची असेल. (Skoda Kodiaq)
ही गाडी हायब्रीड असेल. त्यामुळे १.५ लीटरच्या टीएमआय इंजिनाबरोबरच यात २५.७ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरीही असेल. ७ स्पीडचा गिअरबॉक्स असेल. याशिवाय कंपनीने ग्राहकांसाठी २.० लीटरच्या इंजिनाचा पर्यायही देऊ केला आहे. यातून २०१ बीएचपी शक्ती निर्माण होऊ शकेल. याशिवाय जागतिक स्तरावर कंपनीने डिझेल इंजिनाचा पर्यायही दिला आहे. (Skoda Kodiaq)
Skoda Kodiaq 2.0 TDI (2024) review
“a hugely impressive family-friendly seven-seat SUV, with lots of space, tremendous practicality and a gorgeous interior.”
Find out more in our review. https://t.co/LMQFxmbHIs pic.twitter.com/YVwqGoq4tZ
— CompleteCar.ie (@completecar) September 15, 2024
(हेही वाचा – Nissan Compact MPV : निस्सान भारतीय बाजारात आणणार ३ नवीन गाड्या, यातील एक एमपीव्ही)
स्कोडाने आपल्या कॉडियाक गाडीची चित्र यापूर्वी अनेकदा प्रसिद्ध केली आहेत. त्यावरून आपल्याला डिझाईनची कल्पनाही येऊ शकते. गाडीची पुढची बाजू ही आधीच्या स्कोडा गाड्यांप्रमाणेच आहे. यात स्कोडाचं नियमित ग्रील आहे. दिवेही ऑक्टेविया किंवा कुशाक सारखेच आहेत. मागच्या खिडक्यांची रचना यावेळी बदलण्यात आली आहे. या गाडीची अंतर्गत रचना अजून पूर्णपणे उघड झालेली नाही. पण, गाडीतील डिजिटल डिस्प्ले हा १२.९ इंचांचा मोठा असणार आहे. (Skoda Kodiaq)
शिवाय कोणत्या मोडमध्ये गाडी चालवायची यासाठी ड्राईव्ह सिलेक्टरही असणार आहे. चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी एडीएस प्रणाली गाडीत असेल. तसंच पॅनोरमिक सनरुफ असेल. ही गाडी कंपनी आधी युरोपीयन बाजारपेठेत आणेल. नंतरच ती भारतात येईल हे नक्की. तिची स्पर्धा टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लॉस्टर या गाड्यांशी असेल. त्यामुळे कारची किंमतही चढी असेल हे गृहित धरलेलं आहे. भारतात ही गाडी नेमकी कधी लाँच होणार यावर स्पष्टता नाही. (Skoda Kodiaq)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community