Assembly Election जवळ आल्याने Samajwadi ही गणपती बाप्पाच्या दारात!

91
Assembly Election जवळ आल्याने Samajwadi ही गणपती बाप्पाच्या दारात!
  • खास प्रतिनिधी 

मतदारांनी नास्तिक समजल्या जाणाऱ्या राजकीय नेत्यांना आस्तिकतेचे धडे घ्यायला भाग पाडले. नास्तिक समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. इतकेच नव्हे तर, मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाजवादी विचारांचे माजी आमदार कपिल पाटील हे देखील आता गणपती दर्शन करत फिरू लागले आहेत. (Assembly Election)

(हेही वाचा – आली निवडणूक… घ्या बाप्पांचे दर्शन; स्वतःला निधर्मी म्हणवणारी Pawar family बाप्पांच्या चरणी लीन)

समाजवादी गणराज्य गोरेगावात!

गोरेगाव पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेले कपिल पाटील यांनी काही गणपती मंडळांना जाहिरात फलक ‘स्पॉन्सर’ केले. गोरेगाव पश्चिम येथील सन्मित्र मंडळ गणेशोत्सव समिति या मंडळाला गेट लावायला पैसे दिले आणि त्यावर स्वतःची जाहिरात केली. या गेटवर ‘गणपती आपल्या प्राचीन समाजवादी गणराज्यांचं प्रतीक’, सुखकर्ता दुःखहर्ता मंगलमूर्ती घराघरात..! समाजवादी गणराज्य गोरेगावात..!’ असा आशय या होर्डिंगवर लिहिलेला असून कपिल पाटील यांचा फोटो आणि समाजवादी गणराज्य पार्टी असे नाव तसेच निवडणूक निशाणी असलेल्या ‘टॉर्च’चा (बॅटरी) फोटोही छापला आहे. (Assembly Election)

New Project 2024 09 16T160149.641

(हेही वाचा – हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे; सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे प्रतिपादन)

समाजवाद्यांच्या गणपती मंडळांना भेटी

या होर्डिंगची चर्चा गोरेगावात होत असून समाजवाद्यांनाही गणरायाने रस्त्यावर उतरवले, अशी टिप्पणी केली जात आहे. काल रविवारी १५ सप्टेंबर २०२४ ला संध्याकाळी या मंडळाच्या गणपती बाप्पाला भेट देऊन मंडळाने मंडपात आयोजित केलेला जवळपास पाच मिनिटांचा चलचित्र देखावा मंडपात बसून पाहिला, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. (Assembly Election)

पवारही राजाच्या दारी

गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी ‘लालबागचा राजा’ मंडळाला आपल्या नातीसह भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले तर आज सोमवारी १६ सप्टेंबरला कधीही गणपती मंडळाला भेट न देणारे अजित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला हजेरी लावली. निवडणुका जवळ आल्याने नास्तिक नेत्यांनाही देवदर्शन घडवले, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.