- ऋजुता लुकतुके
पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानने संघातील स्टार फलंदाज बाबर आझमवर जोरदार टीका करताना, ‘तो बोलतो खूप, करतो कमी,’ अशी भाषा वापरली आहे. इतकंच नाही तर बाबरने विराटकडून काहीतरी शिकावं असंही बोलून दाखवलं आहे. बाबरला अलीकडचा ढासळता फॉर्म नेतृत्व गुण यामुळे तो माजी क्रिकेटपटूंच्या टीकेचा धनी ठरला आहे. मागच्या १६ कसोटी डावांमध्ये बाबरने एकही अर्धशतक झळकवलेलं नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर वैतागलेल्या युनिस खानने कठोर भाष्य केलं आहे. ‘बाबर आणि इतर ज्येष्ठ खेळाडूंनी जर वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघाच्या हिताकडे लक्ष दिलं तर संघाची कामगिरी सुधारू शकेल. पण, हे खेळाडू बोलतात जास्त, हाताने काही करत नाहीत,’ असं युनिस खान म्हणाला.
(हेही वाचा – Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)
युनिसने बाबरसमोर विराट कोहलीचं उदाहरणही ठेवलं आहे. ‘खासकरून बाबरने विराट कोहलीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवं. विराटने कप्तानी सोडली. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. त्याचा परिणाम असा झालाय की, तो आता जागतिक क्रिकेटमध्ये विक्रमांवर विक्रम रचतोय. देशासाठी खेळणं हा तुमचा प्राधान्यक्रम असला पाहिजे,’ असं युनिस खान म्हणाला.
Younis Khan said “Babar Azam can score 15,000 runs but he has to know there are bigger things to achieve than captaincy. Look at Virat Kohli! He left captaincy and he’s breaking records. Players should not be selfish and should think about the country” 🇮🇳🇵🇰🔥
Do you agree? 🤯 pic.twitter.com/sZEbNOKbqz
— Farid Khan (@_FaridKhan) September 15, 2024
युनिस खानने बाबरला आणखी एका गोष्टीची आठवण करून दिली. ‘बाबर सर्वोत्तम खेळाडू होता म्हणून त्याला कर्णधार केलं गेलं. त्याच्याकडून अपेक्षा नेहमीच असणार आहेत. त्याने खेळाडू म्हणून त्या पूर्ण कराव्यात,’ असा सल्लाही युनिस खान यांनी एका पॉडकास्टमध्ये दिला आहे. पाकिस्तान संघाने घरच्या मैदानात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर संघातील प्रमुख खेळाडू आणि खासकरून बाबर आझमवर सगळीकडून टीका हेतेय. दुसरीकडे विराट सध्या भारताकडून कसोटी मालिकांची तयारी करतो आहे. टी-२० क्रिकेटमधून त्याने निवृत्ती पत्करली आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community