- ऋजुता लुकतुके
भारताचा प्रमुख तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नवीन कसोटी हंगामासाठी तयार होत आहे. या हंगामात भारताला १० कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यासाठी तंदुरुस्ती महत्त्वाची ठरणार आहे. अशावेळी एका कार्यक्रमात त्याला एक रॅपिड प्रश्न विचारण्यात आला की, भारतीय संघात सगळ्यात तंदुरुस्त कोण आहे? आणि त्यावर बुमराहनेही क्षणाचा विलंब न लावता मजेशीर उत्तर दिलं. विराट किंवा रवी जाडेजाचं नाव न घेता त्याने चक्क स्वत:चं नाव घेतलं.
(हेही वाचा – K L Rahul : के एल राहुलचे पुढील वर्षी बंगळुरू फ्रँचाईजीकडून खेळण्याचे संकेत)
तेज गोलंदाजीसाठी तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. तेज गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण कायमच करू, असं जसप्रीतने बोलून दाखवलं. भारतीय संघात तंदुरुस्तीचीचं खरं महत्त्व वाढवलं ते विराट कोहलीने. विराटचं उदाहरण क्रिकेटच नाही तर इतर खेळांमध्येही दिलं जातं. त्या खालोखाल रवींद्र जाडेजा आणि के एल राहुल यांची शारीरिक तंदुरुस्ती नेहमी मैदानावर दिसून येते. पण, राहुलला वारंवार दुखापती होतात. त्या मानाने कोहली आपली कारकीर्द दुखापतींपासून मुक्त ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
(हेही वाचा – शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर; भाजपाच्या Gopichand Padalkar यांचा पवारांना खोचक टोला)
बुमराहने (Jasprit Bumrah) मात्र स्वत:चं नाव घेतलं. ‘मला माहीत आहे, तुम्हाला अपेक्षित उत्तर काय आहे. पण, मी वेगळंच नाव घेणार आहे. मी माझं स्वत:चं नाव घेणार आहे. कारण, मी तेज गोलंदाज आहे. काही वर्ष खेळतोय. भारतातील गरम वातावरणात तेज गोलंदाजी सातत्याने करणं किती कठीण आहे याची तुम्हाला कल्पना असेलच. म्हणून तेज गोलंदाजीचा पुरस्कार म्हणून मी माझं नाव घेणार आहे,’ असं बुमरा गंमतीने म्हणाला आणि मग हसलाही. त्याच्या या उत्तरावर एकच हशा पिकला. लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवातील देखाव्याच्या माध्यमातून उलगडला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट)
Love this confident standing up for himself version of Bumrah 🔥 pic.twitter.com/JK4aaHV3Tg
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 13, 2024
टी-२० विश्वचषकात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अंतिम सामन्यातही त्याची शेवटची दोन षटकं निर्णायक ठरली. या यशानंतर साधारण दीड महिन्यांची विश्रांती घेऊन तो नवीन हंगामासाठी तयार झाला आहे. भारतीय संघाबरोबर तो सध्या चेन्नईत आहे. देशातील ५ कसोटींनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो सज्ज होतोय. नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ५ कसोटी खेळणार आहे. पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा या दोन स्पर्धांचं उद्दिष्टं भारतीय संघाने समोर ठेवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community