- प्रतिनिधी
बहुजन समाजवादी पक्षाकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये मायावती यांनी अनेक खुलासे केले आहेत. शिवाय सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर देखील बऱ्यापैकी तोंडसुख घेतले आहे. बसपाकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एका पुस्तिकेचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये मायावतींनी म्हटले आहे की, २०१९ मध्ये सपा-बसपाची आघाडी तुटली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपले फोन उचलणे बंद केले होते. या कारणाने आघाडी तोडावी लागल्याचे मायावतींनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशात दोन वर्षांपूर्वी झालेली विधानसभा आणि यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर राहिले. याचा सर्वाधिक फटका मायावतींना बसला. लोकसभेत काँग्रेस आणि सपाने आघाडी केली होती. (Samajwadi Party)
(हेही वाचा – Assembly Election जवळ आल्याने Samajwadi ही गणपती बाप्पाच्या दारात!)
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यामधील राजकीय वैर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ना लोकसभा ना विधानसभा, कुठल्याही निवडणुकीत हे दोन पक्ष आघाडी तर सोडाच पण नेतेही समोरासमोर यायला तयार नाहीत. २०१९ मध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीवर शेवटचा घाव घालण्यात आला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतरच दोन्ही पक्षांमधील दरी वाढत गेली आणि आघाडी तुटली. मायावतींनी ही आघाडी तुटण्यामागचे खरे कारण सांगितले. (Samajwadi Party)
(हेही वाचा – Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?)
उत्तर प्रदेशात दोन वर्षांपूर्वी झालेली विधानसभा आणि यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर राहिले. याचा सर्वाधिक फटका मायावतींना बसला. लोकसभेत काँग्रेस आणि सपाने आघाडी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. मात्र, मायावतींनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मायावतींनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्याकडून टीम तयार केली जात आहे. त्याआधी त्यांनी सपा आणि बसपामधील आघाडी तुटण्याचे कारण सांगताना अखिलेश यांच्यावर थेट आरोप केला आहे. (Samajwadi Party)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community