Sanjay Shirsat: संजय शिरसाटांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती!

97
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांची 'सिडको'च्या अध्यक्षपदी नियुक्ती!
Sanjay Shirsat: संजय शिरसाटांची 'सिडको'च्या अध्यक्षपदी नियुक्ती!

शिवसेना आमदार संजय शिरसाटांची (Sanjay Shirsat) सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (सिडको) महामंडळाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय

०१. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल २०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन श्री. संजय शिरसाट, वि.स.स. यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या अध्यक्ष पदावर (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे. (Sanjay Shirsat)

०२. श्री. संजय शिरसाट, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) यांना वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक शासाऊ-१०.०२/प्र.क्र.०६/०३/सा.उ., दि.२२ ऑगस्ट, २००३ आणि शासन निर्णय क्रमांक शासाऊ १०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.उ., दि.१३ मार्च, २०१२ मधील तरतुदींनुसार सेवा सुविधा उपलब्ध असतील. (Sanjay Shirsat)

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९१६१६२४३०६५२५ असा आहे. सदरहू शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. (Sanjay Shirsat)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.