Goregaon Constituency मध्ये महाविकास आघाडीत फूट; कपिल पाटील विरुद्ध Shiv Sena UBT?

192
Goregaon Constituency मध्ये महाविकास आघाडीत फूट; कपिल पाटील विरुद्ध Shiv Sena UBT?
  • खास प्रतिनिधी 

राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडली असून गोरेगाव (Goregaon) विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा विरुद्ध माजी आमदार कपिल पाटील (Patil) अशी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटील यांनी शिवसेना उबाठाच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. (Goregaon Constituency)

लोकभारती जनता दल(यु) मध्ये विलिन

कपिल पाटील यांनी त्यांच्या लोकभारती या पक्षातर्फे तीनवेळा राज्य विधान परिषदेची निवडणूक शिक्षक मतदारसंघातून लढवली आणि जिंकले. २०१७ मध्ये पाटील यांनी लोकभारती हा पक्ष जनता दल (यु) या पक्षात विलिन केला. मार्च २०२४ पर्यंत ते जनता दल पक्षात होते तर लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दलमध्ये फूट पडली आणि पक्ष भाजपाप्रणीत ‘एनडीए’ मध्ये सामील झाला. (Goregaon Constituency)

(हेही वाचा – Pune Ganpati Visarjan: पुण्यात विसर्जनावेळी वाहतुकीमध्ये मोठा बदल! प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणता?)

ठाकरेंच्या उपस्थितीत नवा पक्ष

त्यानंतर मध्ये कपिल पाटील जद(यू) (JD-U) बाहेर पडले आणि मार्च २०२४ धारावीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत स्वतःचा वेगळा ‘समाजवादी गणराज्य पक्ष’ स्थापन केला. पाटील यांनी कायम महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र गेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उबाठाने मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीची मते फुटली आणि शरद पवार पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) जयंत पाटील यांचा पराभव झाला. (Goregaon Constituency)

लहान पक्षांचा ‘मविआ’कडून वापर

यावरून कपिल पाटील (Kapil Patil) यांनी तीव्र संताप व्यक्त करत ‘लहान पक्षांचा महाविकास आघाडी वापर करून सोडून देते,’ असा आरोप केला आणि महाविकास आघाडीपासून कपिल पाटील यांनी फारकत घेतली. सध्या गोरेगाव (Goregaon) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी कपिल पाटील यांनी सुरू केली आहे. (Goregaon Constituency)

(हेही वाचा – ‘दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू..’, Amit Shah यांचा किश्तवाडमध्ये एनसी-काँग्रेसवर हल्लाबोल)

उबाठाकडून देसाई

याच मतदार (Goregaon) संघातून माजी नगरसेवक समीर देसाई यांना निवडणूक लढण्याची तयारी करण्याच्या सूचना शिवसेना उबाठाने दिल्या असल्याचे समजते. त्यामुळे गोरेगाव पश्चिम या या मतदारसंघातून शिवसेना उबाठा विरुद्ध समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील (Kapil Patil) तसेच भाजपा उमेदवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. गेली दहा वर्षे भाजपाच्या विद्या ठाकूर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करत आहेत. यावेळी ठाकूर यांना भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. (Goregaon Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.