विधानसभेच्या जागा वाटपाचा पेच संपला; Chandrakant Bawankule यांनी सांगितला नवा फॉर्म्युला  

157
विधानसभेच्या जागा वाटपाचा पेच संपला; Chandrakant Bawankule यांनी सांगितला नवा फॉर्म्युला  
विधानसभेच्या जागा वाटपाचा पेच संपला; Chandrakant Bawankule यांनी सांगितला नवा फॉर्म्युला  

महायुतीने (Mahayuti) विधानसभेसाठी कंबर कसली असून, विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर व्हायची अजून बाकी आहे. यावेळी भाजपाचे नेते चंद्रकांत बावणकुळे यांनी विधानसभेच्या जागा (Legislative Assembly seats) वाटपाबद्दल माध्यमांशी संवाद साधला. बावणकुळे म्हणाले की, आरक्षणाचे खरे मारेकरी हे काँग्रेस आहे, तसेच महायुतीतील ८०-९० जागा लढविणार असा जागावाटपाचा फॉर्म्युलाच संपला असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. (Chandrakant Bawankule)

आम्ही आरक्षण रद्द करू असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेसच्या (Congress) तीन पिढीच्या जे  पोटात होते ते आज त्यांच्या ओठात आले. NDA सरकार संविधान बदलणार असे वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे. जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.  (Chandrakant Bawankule)

(हेही वाचा – Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक! ८ जणांचा मृत्यू)

महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन करायचे आहे. या नेत्यांनी ८० नाही ९० नाही कुठलाही आकड्यावर न जाता जिथे अजित पवार (Ajit Pawar) जिंकतील तिथे अजित पवार लढतील, जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह,  जिथे आमचे उमेदवार तेथे आमचा आग्रह मान्य केले जाणार आहे. फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ, हा महायुतीचा आग्रह असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.