BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण

261
BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) विद्यार्थ्यांना आता क्रीडा क्षेत्रातही निपुण करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला असून आतापर्यंत महापालिका शाळांना क्रीडांगण उपलब्ध करून दिल्यानंतर आता या मुलांसाठी शालेय साहित्याचीही खरेदी केली जात आहे. त्यामुळे खेळाच्या प्रकारातील तीस विविध प्रकारचे साहित्यांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे यापुढे महापालिका शाळांमधील मुले आता क्रीडा क्षेत्रात निपुण होऊन भविष्यात ऑलिम्पिकसह इतर खेळाच्या स्पर्धेत प्राविण्य मिळवताना दिसतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? जाणुन घ्या…)

मुंबई महापालिका शाळेतील (BMC School)  विद्यार्थ्यांचा शारिरीक विकास होण्यासाठी शारिरीक शिक्षण विभागाद्वारे विवध खेळ शिकवले जातात. यासाठी महापालिकेच्या शाळांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांचा विकासही करण्यात येत आहे. परंतु एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे खेळ आणि स्पर्धा घेतल्या जातील अशाप्रकारे सुसज्ज क्रीडांगण सध्या उपलब्ध नाहीत म्हणून महापालिका शाळांमध्ये क्रीडा प्रकार शिकवता येत नसल्याने महापालिक शिक्षण विभागाने आता उपलब्ध शाळेचे क्रीडांगण उपलब्ध नाही म्हणून महापालिकेच्या शाळांमधील उपलब्ध जागेत जास्तीत जास्त क्रीडा प्रकार शिकवता येईल या हेतून सर्व क्रीडांगण व शालेय इमारतीतील हॉलमध्ये खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

(हेही वाचा – भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करा; हिंदु जनजागृती समितीची BCCI कडे मागणी !)

त्यानुसार बॉसिंग, बॉस्केट बॉल, कुस्ती, कॅरम, बुध्दीबळ, टेबल टेनिस, ज्युडो, टायक्वाँडो, कबड्डी, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, बॅडमिँटन, लेझिम, योगा आदी खेळांचे साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या खेळाच्या साहित्य खरेदीसाठी बिलार्ड इंडस्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात येत आहे. यापूर्वी महापालिका शाळेतील नरसिंह यादव या कुस्तीपटू हा ऑलिम्पिंगमध्ये यशस्वी ठरला होता. नरसिंह यादव याने ऑलिम्पिंकमध्ये सुवर्ण पदक पटकावून देशासह मुंबई महापालिकेचे नाव मोठे केले होते. (BMC School)

(हेही वाचा – Sanjay Shirsat: संजय शिरसाटांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती!)

कोणत्या खेळासाठी कोणते घेणार साहित्य
  • बॉस्किंग किट, किट बॅग, रिंग, पॅड
  • बास्केट बॉल हुप, बॉल,ड्रेस, कॉस्टयूम
  • कुस्तीचा पोशाख
  • कॅरम सेट स्टॅड आणि स्ट्रायकर
  • बुद्धीबळ बोर्ड व नाणी
  • टेबल टेनिस बॅट, स्टँडसह टेबल टेनिस स्टँड, टेनिस बॉल,
  • ज्युडो पोशाखा, ज्युडो मॅट
  • तायक्वॉडो
  • किक बॉक्सिंग
  • वुशू
  • कबड्डी ड्रेस, मॅट,
  • व्हॉली बॉल, नेटसह व्हॉलीबॉल गोलपोस्ट
  • डॉजबॉल
  • नेटसह व्हॉलीबॉल गोलपोस्ट
  • डॉजबॉल
  • नेट आणि स्टँडसह बॅडमिंटन
  • बॅडमिंटन रॅकेट, शटल
  • लेझिम
  • वजनमापक यंत्र
  • दोरी उडीची दोरी
  • योगामॅट तथा चटई (BMC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.