Modak Sagar Dam मधील गाळ सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ‘मेरी’ वर

269
Modak Sagar Dam मधील गाळ सर्वेक्षण करण्याची जबाबदारी 'मेरी' वर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मोडक सागर धरणातील (Modak Sagar Dam) गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्यात येत असून या मोडक सागर धरणाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार आता अभ्यासाची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम पुर्ण केले असून आता दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध पाणी पातळीचा ते नदी तळातील पातळी पर्यंतचा अभ्यास हा बॅथीमेट्री पद्धतीने करण्यात येत आहे. या दुसऱ्या टप्प्यातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासन मोडक सागर तलावातील गाळाबाबतचा पुढील निर्णय घेईल, असे बोलले जात आहे.

केंद्रीय जल आयोग नवी दिल्ली (CWC) च्या निकषानुसार महानगरपालिकेच्या मोडक सागर जलाशयाचे (Modak Sagar Dam) गाळ सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या जलाशयाचे गाळ सर्वेक्षण करण्यासाठी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार कार्यकारी अभियंता (मेरी) यांनी या कामासाठी सहमती दर्शवली आहे, त्यानुसार मोडक सागर जलाशयाचे गाळ सर्वेक्षणाचे काम हे दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील टप्पा-१ मध्ये अभ्यासाची तांत्रिक व्यवहार्यता अर्थांत टेक्निकल फिजिबिलीटी तपासण्याबाबतचे काम यंत्राने पुर्ण केले आहे. त्याचा अहवाल त्यांनी जलअभियंता विभागाला सादर केला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी नमुद केल्याप्रमाणे जलाशयाचा गाळ सर्वेक्षण अभ्यास हा हायब्रीड पद्धतीत म्हणजेच उपलब्ध पाणी पातळीचा ते नदी तळापर्यंत पातळीचा पर्यंतचा अभ्यास हा उपलब्ध पाणी पातळी ते पूर्ण जमा होणाऱ्या पाणी पातळीचा अभ्यास तंत्रज्ञाने केला जाणार आहे. त्यासाठीची सूदर संवेदन तंत्राच्या पायाभुत सुविधा मेरीकडे उपलब्ध असून अचूक परिमाण प्राप्त करण्यासाठी गाळ सर्वेक्षण डीजीपीएस आधारी बाथीमेट्री या तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात येत आहे. (Modak Sagar Dam)

(हेही वाचा – गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकांसाठी २५ हजार Mumbai Police बंदोबस्तासाठी तैनात)

या पद्धतीने सर्वेक्षण करण्यासाठी लागणारी यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध यंत्राचा अहवाल, ‘मेरी’ ने दिल्यास त्याचे तांत्रिक प्रमाणिकरण लगेच सुदूर संवेदन तंत्राने तपासणी करण्याचे काम मेरी कार्यालयामार्फत सशुल्क पद्धतीने करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) गृह विभाग, (बंदरे परिवहन) महाराष्ट्र सागरी मंडळ जल आलेख कार्यालयामार्फत पोर्ट, हार्बस अँड वॉटरवे खाडी तसेच नदी तसेच तलाव इत्यादींचे हायड्रोग्रॉफिक्स सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Modak Sagar Dam)

मोडकसागर जलाशयाचे बॅथीमेट्री सर्वेक्षण करण्यासाठी या कामाचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळ जलआलेखक व बॅथीमेट्री सर्वेक्षणाच्या अहवालाचे सनियंत्रण तांत्रिक प्रामाणिकरण व गाळ सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल देण्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या नामवंत संस्थांची नेमणूक करण्यात आली असून यासाठी सुमारे साडे अकरा लाख रुपये खर्च केले जाणार आहे.  (Modak Sagar Dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.